World-class welding institute to be set up in Nagpur : वेल्ड कनेक्ट परिषदेत दिला शब्द; रोजगाराच्या संधी निर्माण होतील
Nagpur महाराष्ट्राने बॉयलर निर्मितीत आपला लौकिक निर्माण जरी केला असला तरी या क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ हवे त्या प्रमाणात नाही. हीच बाब लक्षात घेता नागपुरात गुणवत्ता असलेले तसेच जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले वेल्डिंग इन्स्टिट्यूट साकारू अशी माहिती कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. नागपुरात आयोजित वेल्ड कनेक्ट परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाला अर्थ, नियोजन व कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, बाष्पके विभागाचे संचालक धवल अंतापूरकर, सहसंचालक स. ग. चौधरी, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीचे संचालक संजय मारुडकर, ऑरेंजबीक टेक्नॉलाॅजीचे व्यवस्थापकीय संचालक भानु राजगोपालन यावेळी उपस्थित होते.
Operation Sindoor : खासदाराने एक महिन्याचे वेतन दिले सैनिकांसाठी
बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडित असून परिपूर्ण कौशल्य असलेले वेल्डिंग क्षेत्रातील मनुष्यबळ याला अत्यंत आवश्यक आहे.रोजगार निर्मितीच्या दृष्टीने या क्षेत्रातील जागतिक नावलौकिक साध्य करण्यासाठी तेवढ्याच गुणवत्तेची वेल्डिंग इन्स्टिट्यूट नागपूर येथे लवकरच साकारू, असे फुंडकर यांनी सांगितले.
बॉयलर निर्मितीच्या, व्यवस्थापनाच्या आणि याच्या देखभाल व दुरुस्तीसंदर्भात काही तांत्रिक आविष्कार साध्य करता येतील का हा कळीचा मुद्दा आहे. यासाठी बॉयलर इंडस्ट्रीमधील सर्व तज्ज्ञांनी, अभियंत्यांनी आपल्या कल्पनांचे आदानप्रदान केले पाहिजे. त्यावर विचार मंथनही झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Mahayuti Government : बोनस अजूनही वाटेतच; खात्यात पैसे येण्यासाठी प्रतिक्षाच
वेल्डिंगचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे असतानाही विदर्भातून या क्षेत्राकडे कमी प्रमाणात युवक वळले. या क्षेत्रात विदर्भातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवता येईल. यादृष्टीने नागपूर येथे होऊ घातलेल्या वेल्डिंग इन्स्टिट्यूटसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन कामगार व वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी यावेळी दिले.