Underpass built at a cost of Rs 50 crore flooded : जबाबदार कोण?; पावसात जलमय, नागरिक त्रस्त
Akola शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला अंडरबायपास प्रकल्प ज्या उद्देशाने उभारण्यात आला, त्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तब्बल ५० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येमुळे नागरिक आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एका ऑटो रिक्षाचालकाचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, तो रिक्षा ढकलताना दिसतो. या फोटोला “५० कोटींचं वॉटर सर्व्हिसिंग सेंटर” असा खोचक मथळा देण्यात आला आहे. हे दृश्य केवळ हास्यास्पद नसून, शासकीय यंत्रणेच्या अपयशावर कठोर भाष्य करणारे आहे.
Mahayuti Government : भाजप-राष्ट्रवादी भिडले, अमरावतीत महायुतीमध्ये तणाव
या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) प्रदेश संघटक सचिव जावेद ज़करिया म्हणाले की, “यशाचं श्रेय घेण्यासाठी नेहमीच अनेक हात पुढे येतात, पण अपयशाची जबाबदारी स्वीकारायला कोणीही तयार नाही. एवढा मोठा निधी खर्च करूनही, आजही नागरिकांना जलमय रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागतो, हे दुर्दैवी आहे.”
निवडणूक काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर नागरिकांनी प्रश्न विचारणे हा त्यांचा अधिकारच आहे. त्यामुळेच आज अकोला शहरातील जनता थेट प्रश्न विचारते, “या फसलेल्या अंडरबायपास प्रकल्पाला जबाबदार कोण?”
Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर, गजानन वाघ जिल्हाप्रमुख
“या गंभीर मुद्यावर सर्वपक्षीय आणि प्रशासनाने खुली चर्चा करणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची अशा प्रकारे होणारी उधळपट्टी थांबायला हवी,” असे आवाहनही ज़करिया यांनी केले.