Akola district ranks second in the state in housing construction : उद्दिष्टाच्या 183 टक्के कामगिरी; राज्यात दुसरा क्रमांक
Akola ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमात अकोला जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करताना उद्दिष्टाच्या 183 टक्के काम पूर्ण करून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्यात एकूण 4 हजार 600 घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.
शासनाच्या महाआवास अभियानात अकोला जिल्ह्यासाठी ग्रामीण भागात 2 हजार 516 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने या उद्दिष्टापलीकडे जाऊन 4 हजार 600 घरकुले पूर्ण केली आहेत. ही कामगिरी घरकुलांना मंजुरी देणे, पहिला हप्ता वितरित करणे, जागा उपलब्ध करून देणे आणि घरकुलांचे बांधकाम पूर्ण करणे या टप्प्यांनुसार करण्यात आली.
Yavatmal Congress : नेत्यांना बाजुला ठेवले; कार्यकर्त्यांना जवळ केले!
ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 27 हजार 413 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र देण्यात आले. यापैकी 21 हजार 627 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी महाआवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अभिनंदनg केले आहे. राज्यात रत्नागिरी जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून अकोला दुसऱ्या स्थानावर आहे.
पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, तत्कालीन सीईओ बी. वैष्णवी, सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प संचालक मनोज जाधव, जिल्हा प्रोग्रामर, ऑपरेटर, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, घरकुल ऑपरेटर, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, गृहनिर्माण अभियंते आणि रोजगार सेवक यांनी यासाठी मेहनत घेतली.
Chandrashekhar Bawankule : विकास कामांसाठी वेळ मिळत नाहीये, आम्ही कशाला धमक्या देऊ ?
जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत स्तरावर सर्व अधिकारी सातत्याने प्रयत्नशील आहेत, असं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी म्हटलं आहे.