Akola airport : आधी हवेत घोषणा, आता अर्थसंकल्पात ‘लँडिंग’

akola-airport-expansion-announced-in-maharashtra-budget-2026 : अकोला विमानतळ विस्तारीकरणाला हिरवा कंदील

Akola राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात अकोला येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकोला विमानतळ विस्तार प्रकल्पाला अखेर गती मिळणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत हवेत घोषणा सुरू असताना प्रत्यक्ष अर्थसंकल्पात लँडिंग झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

अकोल्यातील शिवणी येथील विमानतळावरुन नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी तसेच ‘रात्रकालीन अवतरण’ (नाईट लॅंडिंग) सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या धावपट्टीची लांबी सुमारे १,४०० मीटर असून ती वाढवून १,८०० मीटर करण्याचा प्रस्ताव आहे.

Kharif season : खरेदीचे उद्दिष्ट संपले, पण शेतकऱ्यांचा माल घरातच!

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ताब्यातील सुमारे ६० हेक्टर जमीन २०१६ मध्ये संपादित करून भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित २२.१४ हेक्टर खासगी जमीन संपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

ही खासगी जमीन संपादित करण्यासाठी २०८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला गेल्या नोव्हेंबर महिन्यात राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अकोला विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्याने उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

big blow to UBT : जळगावच्या राजकारणात मोठी घडामोड; ठाकरेंचा मोठा शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत

दरम्यान, विमानतळ विस्तारासाठी आवश्यक असलेली २२.१४ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यासाठी शासनाने यापूर्वीच २०८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.