Breaking

Akola Bar Association Election : बार असोसिएशन अध्यक्षपदी अॅड. हेमसिंह मोहता!

 

Adv. Hemsingh Mohata is Bar Association President : उपाध्यक्ष अॅड. संतोष वाघमारे, महिला उपाध्यक्ष अॅड. सुनिता कपिले

Akola अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. हेमसिंह मोतिसिंह मोहता विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी अॅड. संतोष वाघमारे, महिला उपाध्यक्षपदी अॅड. सुनिता कपिले आणि सहसचिवपदी अॅड. प्रदीप रोकडे यांनी विजय मिळवला.
अॅड. हेमसिंह मोहता यांनी सलग दुसऱ्यांदा अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा मान पटकावला आहे, हे महत्त्वाचे.

शनिवारी अकोला बार असोसिएशनची निवडणूक पार पडली. मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली आणि त्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. एकूण १३१८ वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी अॅड. दिलदार खान, अॅड. हेमसिंह मोहता आणि अॅड. रविकांत ठाकरे यांच्यात तिरंगी लढत झाली.

Dr. Pankaj Bhoyar : पोलीस कुटुंबीयांच्या समस्या मार्गी लावणार

 

अॅड. हेमसिंह मोहता यांनी ६४२ मते मिळवत विजय मिळवला. इतर उमेदवारांमध्ये अॅड. दिलदार खान यांना ४८० मते, तर अॅड. रविकांत ठाकरे यांना १९३ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी अॅड. संतोष वाघमारे यांनी ६४२ मते मिळवत विजय मिळवला. इतर उमेदवारांमध्ये अॅड. मिलिंद लहरिया यांना ५६८ मते, तर अॅड. सौरभ तेलगोटे यांना ९९ मते मिळाल्या.

महिला उपाध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. अॅड. सुनिता कपिले यांनी ८९९ मते मिळवत विजय मिळवला, तर अॅड. संगीता गावंडे यांना ४०५ मते मिळाली. सहसचिव पदासाठी तिरंगी लढत झाली. अॅड. प्रदीप रोकडे यांनी ५७३ मते मिळवत विजय मिळवला. इतर उमेदवारांमध्ये अॅड. महेश शिंदे यांना ४६२ मते, तर अॅड. साक्षी लढा यांना २७३ मते मिळाल्या.

Mahakumbhmela : अमरावतीच्या भाविकांचे कुंभमेळ्यात हाल

 

निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. यू.पी. नाईक, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. एस.एस. जोशी, अॅड. ए.जे. ठाकूर, अॅड. धीरज शुक्ला आणि अॅड. आशिष तिवारी यांनी जबाबदारी पार पाडली.