Akola BJP : अकोला भाजपमध्येही फिरणार भाकरी?

 

Preparations for organizational elections in Akola : संघटनात्मक निवडणुकीची तयारी; नव्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष

Akola भारतीय जनता पक्षात (भाजप) संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षपदासाठी नव्या नेतृत्वाची निवड लवकरच होणार आहे. अकोला जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील संघटनात्मक निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

बूथप्रमुख व मंडळप्रमुखांची निवड पूर्ण झाल्यानंतर आता हेच मंडळप्रमुख जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष निवडणुकीत मतदान करणार आहेत. २७ एप्रिल रोजी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी संघटनात्मक आढावा घेतला. या बैठकीत नव्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

भाजपची मजबूत पक्षबांधणी, शिस्तबद्ध संघटन व जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याची कार्यपद्धती यामुळे पक्षाला जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे-पाटील आणि महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीत पक्षाने विजय संपादन केला होता. विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम वगळता इतर तिन्ही मतदारसंघात भाजपने आपली पकड कायम राखली.

Anti-Corruption bureau : सापळा रचला अन् ८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!

जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षपदाचा फेरबदल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे अनुभवी व परिणामकारक नेतृत्वाला जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे बोलले जात आहे.

Terrorist attack in Pahalgam : भीती, चिंता आणि थरारक अनुभव!

नव्या चेहऱ्यांना संधी?

भाजपने जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षपदासाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे. सध्या पक्षात तरुण नेतृत्वाची भर पडली असून जिल्हाध्यक्षपदासाठी डॉ. अमित कावरे आणि अंबादास उमाळे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र भाजपच्या अचानक निर्णय घेण्याच्या पद्धतीनुसार, ऐनवेळी एखादे नवे नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Local Body Elections : काँग्रेसला झाली निवडणुकीची घाई; सरकारला इशारा

महानगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये बरीच खलबते सुरू आहेत. या पदासाठी माजी महापौर विजय अग्रवाल व विद्यमान महानगराध्यक्ष जयंत मसने यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, शेवटच्या क्षणी कोणते नाव पुढे येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.