Breaking

Akola District : थेट ग्रामस्थ देणार निवडून १० सरपंच !

 

10 sarpanchs will be elected directly by the people : ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर

Akola अकोला जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह विविध ग्रामपंचायतींतील १२५ रिक्त पदांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये दहा सरपंच थेट ग्रामस्थ मतदानाद्वारे निवडणूक देणार आहेत.

अलीकडच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत असल्याने अनेकांना चिंता लागली होती. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली असल्याने इच्छुकांची उत्सुकताही वाढली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १९ ते २४ मार्च या कालावधीत प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील आक्षेप व हरकती तहसील कार्यालयात स्वीकारल्या जातील.

Akola administration : नायब तहसीलदारांनी दिलेले जन्म-मृत्यू दाखले रद्द

त्यानंतर अंतिम मतदार यादी २६ मार्च रोजी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्र. ग्रा. पं. निवडणूक उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी दिली. या निवडणुकीत १० थेट सरपंचपदांसह एकूण १२५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदारांनी वेळेत आपले नाव मतदार यादीत तपासावे आणि आवश्यक असल्यास हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Akola-Washim District Central Bank : कर्ज पुनर्गठन घोटाळा पोहोचला विधिमंडळात!

तालुकानिहाय सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती

तेल्हारा – २
अकोट – २
मूर्तिजापूर – ४
अकोला – ३
बाळापूर – २
बार्शीटाकळी – २
पातूर – ५

तालुकानिहाय रिक्त पदांचा तपशील

तेल्हारा – ११
अकोट – २६ (४ थेट सरपंच रिक्त)
मूर्तिजापूर – १२ (१ सरपंच रिक्त)
अकोला – ३० (३ सरपंच रिक्त)
बाळापूर – १४
बार्शिटाकळी – २० (१ सरपंच रिक्त)
पातूर – १२ (१ सरपंच रिक्त)