217.51 crore for water supply scheme in extension area : प्रस्तावास मान्यता; पाणीटंचाईची समस्या मिटणार
Akola अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी उचलण्यात आली आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२ योजनेअंतर्गत २१७.५१ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस नगर विकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांची पाणीटंचाई दीर्घकालीन दूर होणार आहे. विकासाभिमुख भूमिकेचा पुनरुच्चार झाला आहे.
या प्रस्तावाला २२ मे २०२५ रोजी शासन निर्णय क्रमांक अमृत-२०२४/प्र.क्र.६०४/नवि-३३ अंतर्गत मंजुरी मिळाली. या योजनेसाठी आमदार रणधीर सावरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान खासदार अनुप धोत्रे यांचे आभार मानले आहेत.
महानगरपालिकेच्या हद्दवाढ प्रक्रियेत सुमारे २४ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना मुलभूत सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिगाव प्रकल्पातून वाढीव पाणी मिळवण्यासही आमदार सावरकर यांना यश मिळाले असून, वान प्रकल्पावरील शेतकऱ्यांच्या सिंचन हक्कावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
या योजनेच्या मंजुरीसाठी माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, विद्यमान खासदार अनुप धोत्रे, विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल तसेच माजी महापौर अर्चना मसने यांचे मोलाचे योगदान राहिले. ७३८ कोटींचा मूळ प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता, मात्र केंद्र शासनाच्या शिखर समितीने निश्चित केलेल्या २२५ कोटींच्या मर्यादेनुसार २१७.५१ कोटींचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
Question raised in the Assembly Hall : महाराष्ट्र हा बोगस बियाणांचा अड्डा !
प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सावरकर यांनी दिली. या योजनेमुळे अकोल्याच्या पाणीप्रश्नावर तब्बल २५ वर्षांचा ठोस उपाय उपलब्ध होणार आहे.