Breaking

Akola Municipal Corporation : अकोलेकरांचा प्रवास होणार वातानुकुलीत, ४२ ई-बसेस मंजूर

Akolekars will travel in air-conditioned vehicles, 42 e-buses approved : आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची माहिती; शहर विकासासाठी १,६७४ कोटींची तरतूद

Akola : अकोला महानगरपालिकेचे उत्पन्न, लोकाभिमुख सेवा आणि आवश्यक सोई-सुविधांच्या खर्चाचा समतोल राखत १०.९२ कोटी शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार मुख्य सभागृहात सन २०२४-२५ चे सुधारित आणि सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेत मनपा आयुक्त डॉ. लहाने यांनी अंदाजपत्रकीय तरतुदींच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले. सभेचे संचालन अनिल बिडवे यांनी केले, तर अंदाजपत्रकीय प्रास्ताविक मुख्य लेखा अधिकारी जगदीश मानमोठे यांनी केले. केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत अकोला शहराला ४२ वातानुकूलित ई-बस प्राप्त होणार आहेत. खडकी दक्षिण झोनमध्ये ई-बस डेपोच्या स्थापत्यविषयक कामासाठी १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Harshawardhan Deshmukh : श्री शिवाजी शिक्षण संस्था मेडिकलच्या जागा वाढवून २०० करणार !

शहरात ई-बसेस संचालित करण्यासाठी चार्जिंग स्टेशन २.५० कोटी, ई-बस सेवा मनुष्यबळासाठी ४ कोटी आणि बस सेवा परिचालनातील तूट भरून काढण्यासाठी ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अमृत-२.० योजनेअंतर्गत अकोला शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ७२१ कोटींपैकी २२३ कोटींच्या कामास तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.

Nana Patole : अवैध हुक्का पार्लरवरून नाना पटोले आक्रमक

२०२५-२६ साठी अंदाजित तरतूद १०० कोटी करण्यात आली आहे. तर मनपा स्वहिस्सा निधी ३० कोटी असणार आहे. मलनिस्सारण योजनेसाठी एकूण प्रकल्प किंमत १,६७४ कोटी असून, पहिल्या टप्प्यात ६२९.०२ कोटी रूपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. २०२५-२६ साठी अंदाजित तरतूद२०० कोटी करण्यात आली आहे. यामध्ये मनपा स्वहिस्सा निधी ६० कोटी असणार आहे. प्रशासकीय इमारतीसाठी १५० कोटींची तरतूद आहे. प्रशासकीय इमारत बांधकाम १५० कोटी, दिव्यांग भवन बांधकाम १५ कोटी, ई-वाहने खरेदी (कचरा व्यवस्थापनासाठी) ७ कोटी तर कचरा संकलनासाठी अभिकर्ता नेमणूक १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अंदाजपत्रकामुळे अकोला शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.