Akola Municipal Corporation : मतदार यादीत दिरंगाई केली तर फौजदारी कारवाई

Criminal action if delay in the voter list : अकोला मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचा इशारा

Akola अकोला महापालिकेची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवरील हरकती व आक्षेपांच्या तपासणीसंदर्भात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा कठोर इशारा आयुक्त व प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी सोमवारी दिला.

महापालिकेच्या मुख्य सभागृहात निवडणूक विभाग, बीएलओ, पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी कार्यप्रगतीचा आढावा घेतला. प्रारूप यादीवर आलेल्या सर्व हरकती व सूचनांची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी संबंधितांकडून अचूक, नियमबद्ध आणि वेळेत अहवाल देण्याचे निर्देश दिले.

Gauri Palve suicide case : गौरीच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप !

या बैठकीस मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त दिलीप जाधव, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र तिवारी, सहायक आयुक्त राजेश सरप, क्षेत्रीय अधिकारी हेमंत शेळवणे, जीआयएस विभाग प्रमुख चंदन प्रसाद, बीएलओ आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

प्राप्त हरकतीवर अचूक शहानिशा, नियमानुसार दुरुस्ती, नागरिकांच्या पत्त्यानुसार योग्य प्रभागात नाव समाविष्ट करणे, या कामात कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही,असा इशारा आयुक्तांनी दिला.

Local body elections : अजित पवारांच्या टीकेला भाजप मंत्री मेघना बोर्डीकरांचा प्रतिहल्ला

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २० नोव्हेंबर रोजी अकोला महापालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. बैठकीत आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, ज्या नागरिकांचा वास्तव्य प्रभाग आहे, त्यांचे नाव त्याच प्रभागाच्या मतदार यादीत आहे का?, याची शहानिशा करून आवश्यक दुरुस्ती अहवालासह तत्काळ सादर करावा.