Akola Municipal Corporation Election : भाजपचा अकोल्यात गुजरात पॅटर्न, साठ टक्के नवीन चेहरे मैदानात

BJP gives candidature to 60% new faces : महायुतीत भाजप ६२, तर राष्ट्रवादी १४ जागांवर लढणार

Akola अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती अंतिम झाली आहे. या युतीनुसार भारतीय जनता पक्ष ६२ जागांवर उमेदवार उभे करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस १४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच चार जागा भाजप मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिली.
भाजपने यावेळी गुजरात पॅटर्नच्या धर्तीवर उमेदवार निवड करत सुमारे ६० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षाने अंतर्गत सर्वेक्षणाच्या आधारे नवीन व अनुभवी कार्यकर्त्यांना तिकीट दिले असून २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी सुमारे ४० टक्के जागांवर नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.

Rahul Narvekar : कुटुंब रंगलंय राजकारणात; भाजपच्या ‘परिवारवादा’वरून वाद!

सामाजिक समतोल राखत उमेदवारांची निवड करण्यात आली असून यामध्ये २८ महिला, ३४ पुरुष, ११ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमाती, १८ ओबीसी तसेच ३२ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांचा संघटन विस्तारासाठी उपयोग करण्यात येणार असून त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रदेश निवड समितीने निश्चित केलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी ना. चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ना. आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने आणि निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांची मान्यता मिळाली आहे. ही माहिती भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली.