Survey for property tax collection starts : भांडवली मूल्याधारित कर प्रणाली लागू करण्यासाठी महापालिकेची तयारी
Akola अकोला महापालिकेने कर संकलनात वाढ करण्यासाठी भांडवली मूल्याधारित मालमत्ता कर प्रणाली लागू करण्याचे पाऊल उचलले असून, त्यासाठी शहरभर प्रत्यक्ष मालमत्ता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कामासाठी अमरावती येथील ‘स्थापत्य’ कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वेक्षणादरम्यान शहरातील नवीन बांधकामे व खुल्या भूखंडांची नोंद घेण्यात येणार आहे. सध्या पूर्व झोनमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून, नोंद न झालेल्या नव्या मालमत्तांवर कर आकारणीस सुरुवात झाली आहे. “कर संकलनात पारदर्शकता आणि अचूकता यावी, यासाठी प्रत्यक्ष मालमत्ता सर्वेक्षण हाती घेतले आहे,” असं महापालिकेचे कर अधिक्षक विजय पारतवार यांनी म्हटलं आहे.
Bacchu Kadu : कर्जमाफीची समिती दिशाभूल करणारी; बच्चू कडूंचा आरोप
महापालिकेच्या कर विभागानुसार, २०१७ नंतर अनेक नव्या मालमत्ता उभारल्या गेल्या, मात्र त्या अद्याप महापालिकेच्या रेकॉर्डमध्ये नाहीत. त्यामुळे संबंधितांकडून कर वसुली होत नाही, आणि पालिकेला मोठ्या प्रमाणावर महसुली नुकसान सहन करावे लागत आहे.
नव्या प्रणालीची वैशिष्ट्ये:
मालमत्ता कर भांडवली मूल्यावर आधारित असणार
सर्वेक्षणाद्वारे नवीन व अनोंदणीकृत मालमत्तांची नोंदणी
कर प्रणालीत पारदर्शकता व न्याय्यता
महापालिकेचा महसूल वाढणार
कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात
Indian Railway : आजपासून धावणार ‘काचीगुडा-भगत की कोठी एक्स्प्रेस’!
सर्वेक्षणाचे काम टप्प्याटप्प्याने शहरभर राबवले जाणार आहे. सुरुवातीला पूर्व झोननंतर इतर झोनमध्ये काम सुरु होईल. सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला ठरावीक मोबदला दिला जाणार आहे. महापालिकेला या उपक्रमामुळे लक्षणीय अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा असून, करसंकलन प्रक्रियेत अचूकता आणि विश्वासार्हता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.