Akola Municipal Corporation : महाविकास आघाडीची चर्चा यशस्वी, जागावाटपावर पडदा कायम

Talks within the MVA successful, but seat-sharing issue remains unresolved : काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी ५० जागांसाठी आग्रही, राष्ट्रवादीची कोंडी

Akola आगामी महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात आघाडी झाल्याचा दावा अकोला पश्चिमचे आमदार साजीद खान पठाण आणि काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी रविवारी केला. मात्र, आघाडीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.

दरम्यान, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी सुमारे ५० जागा लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसून, शिवसेनेसोबत सोमवारी बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शावसेना या तीनही पक्षांची संभाव्य आघाडी सध्या अधांतरी अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

Zilla Parishad Elections : आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक, अमरावती जिल्हा परिषदेचा मार्ग खडतर

रविवारी सायंकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला आमदार साजीद खान पठाण, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ. झिशान हुसेन, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, प्रकाश तायडे, राष्ट्रवादी (शरद पवार)चे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगराध्यक्ष रफीक सिद्दिकी, प्रदेश संघटन सचिव जावेद झकरिया, कार्याध्यक्ष सैयद युसूफ अली तसेच देवेंद्र ताले उपस्थित होते.

या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यातील आघाडी जवळपास निश्चित झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी दोन्ही पक्षांमध्ये काही प्रभागांतील जागांवर मतभेद कायम आहेत. विशेषतः दोन प्रभागांतील जागांवरून वाद असून, त्यावर लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय खुला ठेवण्यात आल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Amravati Municipal Corporation : महाआघाडीच लढणार, पण ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर

तथापि, काँग्रेस किती जागा लढवणार, राष्ट्रवादी (शरद पवार) किती जागांवर उमेदवार देणार आणि उद्धवसेनेला किती जागा सोडल्या जाणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आघाडीचा दावा होत असला, तरी प्रत्यक्ष जागावाटपाबाबत अनिश्चितताच कायम आहे.