Remove the Water hyacinth from Morna river : मोर्णा नदीत वाढलेल्या जलकुंभीमुळे डासांचा प्रादुर्भाव
Akola शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीत वाढलेल्या जलकुंभीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जलकुंभी हटवण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. माजी नगरसेवकांच्या इशाऱ्यानंतर महापालिकेना ‘अॅक्शन मोड’वर आली असून, आतापर्यंत 1.7 किलोमीटर अंतरातील जलकुंभी हटवली आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा यांच्या नियंत्रणाखाली जलकुंभी हटवण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. या कामाचा दैनंदिन आढावा स्वतः आयुक्त डॉ. लहाने घेत आहेत.
Dattatray Bharane : क्रीडामंत्री म्हणाले, मुलांना खेळू द्या, पैसे कमी पडू देणार नाही!
नदीपात्रात उन्हाळ्यात जलकुंभीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती होते आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी आई तुझ्या डोंगरात झोपायला जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने जलकुंभी हटवण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या पोकलेन मशीन आणि मजुरांच्या सहाय्याने जलकुंभी हटवली जात आहे.
या कामासाठी विशेष ‘बकेट’युक्त पोकलेन मशीन वापरण्यात येत असून, त्यामुळे जलकुंभी हटवण्याचे काम चार ते पाच पटीने जलदगतीने सुरू आहे. हे काम अत्यंत कमी खर्चात होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
Bacchu Kadu: शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे तीव्र आंदोलन; बच्चू कडू आक्रमक
आतापर्यंत अकोली खुर्दपासून हरिहरपेठ येथील इदगाह परिसरापर्यंतच्या 1.7 किमी अंतरातील जलकुंभी हटविण्यात आली आहे. उर्वरित नदीपात्रातील जलकुंभीही आगामी काही दिवसांत पूर्णपणे हटवण्यात येणार आहे, अशी माहितीही प्रशासनाने दिली.