Breaking

Akola Police : बायको गेली माहेरी, नवऱ्याने तिच्या बहिणीसोबत थाटला संसार!

 

Wife went to her mother’s house, husband started a family with her sister : दुसऱ्या बायकोने व्हिडिओ कॉलवर माहिती दिली, पोलिसांत तक्रार

Akola कधी काय घडेल याचा हल्ली काही नेम राहिलेला नाही. अलीकडेच अकोल्यातील एका घटनेने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. एकाने नऊ महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज Love Marriage केले. आता अजून पहिली Anniversary पण साजरी झालेली नव्हती. तर नवऱ्याने बायकोच्याच बहिणीसोबत दुसरं लग्न केलं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दुसरीने पहिलीला व्हिडिओ कॉल करून ही माहिती दिली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.

‘पती, पत्नी और वो’ या जुन्या गाजलेल्या चित्रपटाची आठवण करून देणारी ही घटना होती. एका व्यक्तीने पत्नीच्या सख्ख्या मामेबहीणीशीच दुसरे लग्न केले, आणि यामुळे पहिल्या पत्नीने संतापाच्या भरात थेट पोलिस ठाण्यात नवऱ्याला चोप दिला. बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा गावातील सूरज तायडे याची ओळख शिवणी येथील 27 वर्षीय कोमलसोबत एका लग्नसमारंभात झाली.

Minister of Maharashtra : पुन्हा एका मंत्र्याचे वस्त्रहरण !

मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी अंदाजे नऊ महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केले. कोमल अमरावती येथे बीएससीचे शिक्षण घेत होती. तिच्या परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू झाल्याने ती अमरावतीला गेली होती. या दरम्यान, सूरजने कोमलच्या सख्ख्या मामेबहीण श्रेयासोबत एका धार्मिक संस्थेच्या माध्यमातून 18 फेब्रुवारीला दुसरे लग्न केले. श्रेया आणि कोमल या सख्या आते-मामे बहिणी असल्याने श्रेया कोमलच्या घरी वारंवार येत असे. त्याच ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि त्यांनी विवाह केला.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचे प्रदूषण : मुनगंटीवारांचा प्रश्न अन् सीएसटीपीस, वेकोलिची गॅरेंटी जप्त

श्रेयाने स्वतः व्हिडिओ कॉल करून कोमलला या लग्नाची माहिती दिली. हे कळताच कोमल संतापली आणि थेट अकोल्याला परतली. तिने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन पती सुरजविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात सूरज दिसताच कोमलने त्याला चांगलाच हिसका दाखवला. अचानक झालेल्या मारहाणीमुळे पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळ उडाला. हे प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.