Akola Police : महिला पोलीस आणि कुटुंबीयांनी आरोग्याची काळजी घ्यावी

Women police officers and their families should take care of their health : अकोला पोलीस दलातर्फे ‘वॉकथॉन-२०२५’ सिनेअभिनेता स्वप्नील जोशी यांची विशेष उपस्थिती

Akola : अकोला पोलीस दलातर्फे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘वॉकथॉन-२०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन आज (२ मार्च) रोजी करण्यात आले. पोलीस दलातील पुरुष अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांच्या कुटुंबीयांमधील महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये. तसेच महिला अधिकारी व अंमलदारांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चांगले आरोग्य ही काळाची गरज आहे. शारीरिक तंदुरुस्ती आपल्याला सक्षम, सक्रिय आणि कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास तयार ठेवते. चालण्याचा व्यायाम हा सर्वांत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पोलीस समुदायात बंध मजबूत करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी वॉकथॉनचा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे.

Himmatrao Bawaskar on Hair loss : ऐकावे ते नवलच! पंजाबच्या गव्हामुळे केसगळती?

 

वॉकथॉनदरम्यान महिलांमध्ये उत्साह दिसून आला. आल्हाददायक वातावरण, रस्त्यावर लावलेली म्युझिक ट्रॉली आणि ‘चालत राहा, बोलत राहा’ या थीमनुसार सहभागी महिलांनी आनंद लुटला. विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते स्वप्नील जोशी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक रंगत आली. त्यांनी पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधताना सांगितले की, खरे हिरो म्हणजे वर्दीतले हिरो आहेत. महिला पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Mavim Maharashtra : उत्पादनांच्या ब्रँडींगसाठी प्रयत्न करा!

कार्यक्रमात सौरभ गाडगीळ, अकोला महापालिका आयुक्त सुनील लहाणे, महाबीजचे योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्यागी , तसेच पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. सर्व सहभागी महिलांना विशेष टी-शर्ट आणि कॅप देण्यात आल्या. वॉकथॉन पूर्ण केल्यानंतर पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिरिशा बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक वैशाली गुळे, पोलीस निरीक्षक उज्वला देवकर यांचे विशेष योगदान होते. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रमुख आणि शाखा अधिकारी यांनी नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. आभार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पत्नी गौरी कुळकर्णी यांनी मानले.