Breaking

Akola Politics : राजकीय पक्षांना नव्या नेतृत्वाचे वेध !

Unrest among Congress, Vanchit, NCP Politics : काँग्रेस, वंचित, राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता

Politics in akola विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना Local body election सामोरे जाताना सर्वच राजकीय पक्षांनी नव्या नेतृत्वाला प्राधान्य देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विशेषतः प्रमुख राजकीय पक्ष असलेले काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून नव्या नेतृत्वाबाबत विचार केला जात आहे.

अकोला जिल्ह्यात काँग्रेसच्या जिल्हा व शहर प्रमुखांचा कार्यकाळ संपत आला आहे. प्रदेश स्तरावर कार्यकारणीत फेरबदल करण्याबाबत विचार सुरू असल्याने तूर्तास जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना अभय मिळाले असले तरी, लवकरच जिल्हा व शहर प्रमुखांमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्वाबाबत नाराजीचा सूर होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला नवे नेतृत्व मिळण्याची दाट शक्यता आहे.

आंबेडकरांकडे तक्रारी..

याशिवाय वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या सर्वच आघाड्यांचा फेरविचार सुरू केला असून, हा पक्षही नव्या नेतृत्वासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. जिल्हाप्रमुख प्रमुख प्रमोद देंडवे अनेक वर्षांपासून पदावर आहेत. त्यांच्या नेतृत्वाबाबत वंचितमध्ये नाराजी असल्याने, यापूर्वी अनेक वेळा पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तक्रारही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीलाही लवकरच नवीन नेतृत्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंधारेंची बंडखोरी..

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन नेतृत्व पक्षाला लवकरच मिळणार आहे. या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या असून, नव्या जिल्हाध्यक्षांचा शोध पक्षाकडून घेतला जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वावर पक्षाने विश्वास टाकला असला तरी, शहर प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये खांद्येपालट होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून पक्षाने चाचणी सुरू केली आहे.

उद्धव गटाचे जिल्हाध्यक्ष बदलणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यात दोन जिल्हाप्रमुख आहेत. गोपाल दातकर यांच्यावर अकोला पूर्व, पश्चिम व अकोट मतदार संघाचे जबाबदारी आहे. आमदार नितीन देशमुख यांच्याकडे बाळापूर व मूर्तिजापूर मतदारसंघाची जबाबदारी आहे. आमदार देशमुख यांच्याकडे पक्षाने उपनेतेपद सोपवून अकोला बुलढाणा व अमरावती जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर लवकरच नवीन जिल्हाप्रमुख नियुक्त केले जाणार आहे.