Breaking

Akola Zilla Parishad : अकोला जि.प.चा आरोग्य विभाग राज्यात अव्वल

Akola Zilla Parishad Health Department tops the state : राष्ट्रीय कार्यक्रमात मारली बाजी; नऊ महिन्यांत सातवेळा प्रथम क्रमांक

Akola राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गुणानुक्रम निश्चित केला जातो. अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गतवर्षी सात वेळा प्रथम क्रमांक पटकावण्याची कामगिरी केली आहे. डिसेंबर २०२४ च्या राज्यस्तरीय गुणानुक्रमानुसार अकोला जि.प. आरोग्य विभागाने पुन्हा प्रथम क्रमांक मिळवला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याने सात वेळा अव्वल स्थान मिळवले आहे.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत लसीकरण, माता-बाल संगोपन, आरसीएच पोर्टल, आयडीएसपी, एनसीडी, कुटुंब कल्याण कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य निर्देशांकांवर आधारित गुणानुक्रम ठरविण्यात आला. या यशात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य अधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे.

 

Shanbhuraj Desai : ३०० वर्षांपूर्वी असलेला पाचाडचा वाडा होता तसाच निर्माण करण्याचा प्रयत्न !

मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी आणि उपसंचालक आरोग्य डॉ. कमलेश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले. नियमित आढावा, पाठपुरावा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांवर पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. या प्रक्रियेत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग राहिला.

Udhhav Balasaheb Thakrey : आरोपींना फाशीची शिक्षा द्या; शिवसेनेचे आंदोलन

या उल्लेखनीय यशात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत पवार, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि संपूर्ण आरोग्य विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली.