Akot BJP : भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली!

अकोला

Unrest in BJP due to suspension of 11 members : 11 जणांच्या निलंबनावरून अकोट मतदारसंघात अस्वस्थता

Akola जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षातील BJP अकरा जणांवर निलंबनाची कारवाई केली. या निर्णयावरून आता भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. थेट आमदार प्रकाश भारसाकळे MLA Prakash Bharsakale यांच्यावरच कार्यकर्त्यांनी पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. या एकूणच प्रकरणामुळे आता कारवाईचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी बघायला मिळतील, असे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्हाध्यक्षांनी ज्या अकरा पदाधिकाऱ्यांना निलंबित केले, त्यापैकी दोन पदाधिकारी प्रदेश कार्यकारणीतील असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीशिवाय या पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केले, की त्यांच्या आदेशाने निलंबित झाले, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण पाटील यांनी दिले नाही. त्यामुळे एकूणच कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दर्यापूर मतदारसंघातील मूळचे रहिवाशी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी कोणालाही वरचढ होऊ दिले नाही, असा त्यांच्यावर आरोप होतो. तीच राजकीय खेळी आता ते अकोटमध्ये करीत असल्याचा आरोप भाजपमधून निलंबित करण्यात आलेले प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विशाल गणगणे यांनी केला आहे. याशिवाय युवती जिल्हाध्यक्ष चंचल पितांबरवाले हिने सुद्धा किशोर पाटील यांनी केलेली कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वीच आपण पक्षाचा राजीनामा दिला असल्यामुळे माझ्यावर कारवाई केल्याचे दाखवून अकारण बदनामी केली जात असल्याचे चंचल पितांबरवाले हिने म्हटले आहे. जेणेकरून पक्षाकडे कुणी उमेदवारी मांडू नये. विशेष म्हणजे, राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देऊन पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली होती, असा दावा चंचलने केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच वादंग

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आटोपल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. ते बघता सोयीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना तिकिट देता यावी यासाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पक्षातील त्यांना नको असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दूर करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप होत आहे.

पक्षांतर्गत विरोधकांवर कारवाई

विधानसभा निवडणुकीदरम्यान विशाल गणगणे यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यांचा दावा मजबूत असल्याने त्यांना तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पक्षाने विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारी जाहीर केली. आता कोणी पक्षांतर्गत विरोधकच राहू नये म्हणून कारवाईचा सपाटा लावला असल्याचे विशाल गणगणे यांनी म्हटले आहे.