Offensive content on Facebook against Congress MLA : माजी नगरसेविकेची आकोट फाई पोलिसांत तक्रार
Akola काँग्रेसचे अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजीद खान पठान आणि माजी नगरसेविका चांदणी रवी शिंदे यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार आकोटफैल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
संत कबीर नगर, अकोट फैल, अकोला येथील माजी नगरसेविका सौ. चांदणी रवि शिंदे (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अक्षय जोशी (रा. शिल्पकार अपार्टमेंट, राऊतवाडी रोड, अकोला) याने आपल्या मोबाईलद्वारे फेसबुकवर आक्षेपार्ह व अपमानजनक मजकूर पोस्ट केला. या पोस्टद्वारे हिंदू-मुस्लीम समाजात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Local Body Elections : शिंदेसेना-भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, काँग्रेसने केली मोर्चेबांधणी
शिंदे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, १८ ऑगस्ट रोजी कावड व पालखी महोत्सव तसेच २२ ऑगस्ट रोजी पोळा सण अकोल्यात मोठ्या प्रमाणावर साजरे झाले. या कार्यक्रमांना आमदार साजीद खान पठान यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थिती लावली होती. सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तरीदेखील, गैरअर्जदाराने जाणूनबुजून आमदार पठान व शिंदे दांपत्यांविरोधात अपमानजनक मजकूर टाकून कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला, असेही नमूद आहे.
Sanjay Gandhi Scheme : निवेदनानंतरही मानधन नाही, विरोधकांचे मिरवणुकीतून ठिय्या आंदोलन
तक्रारदारांच्या मते, आरोपी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य आहे. तो यापूर्वीदेखील सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरविणारे मजकूर पोस्ट करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाई करून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Local Body Election : आरक्षण अधिसूचना जाहीर; अनेकांचे गणित बिघडण्याची शक्यता
तक्रार नोंदविताना काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये महासचिव अकोला महानगर काँग्रेस कमिटी रवि श्रीराम शिंदे, विजय जामनिक (माथाडी कामगार प्रदेश सरचिटणीस), शैलेंद्र लंकेश्वर, नेते बन्टी भोंडे, युवा नेते अॅड. सोनल विजय शेगावकर, सारिका महेंद्र सत्याल, गोविंदराव गजभिये, धवन सोनोने, तसेच इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.








