Breaking

Charansingh Thakur Salil Deshmukh : काटोलमध्ये पुन्हा ठाकूर विरुद्ध देशमुख !

Allegation that the MLAs have stopped the work : आमदारांनी कामे थांबविल्याचा आरोप, पारंपरिक वैर

Nagpur काटोल मतदारसंघात आमदार चरणसिंग ठाकूर विरुद्ध सलील देशमुख असे चित्र निर्माण झाले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंजूर केलेली विकासकामे चरणसिंग ठाकूर यांनी थांबविली आहेत. असा आरोप सलील देशमुख यांनी केला आहे. यामुळे काटोलमधील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

आमदार ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात दिलेले पत्र उघड झाल्यावर खळबळ उडाली आहे. काटोल मतदारसंघातील देशमुख-ठाकूर लढाई जुनी आहे. २०१९ मध्ये अनिल देशमुख यांनी चरणसिंग ठाकूर यांचा पराभव केला होता. तर २०२४ मध्ये ठाकूर यांनी अनिल देशमुख यांचे सुपूत्र सलील यांना पराभूत केले.

Shetkari Jagar Manch : शेतकरी करणार रात्रभर आंदोलन !

सलील हे अनिल देशमुख यांच्या जागेवर निवडणूक लढले होते. त्यांना चरणसिंग ठाकूर यांनी मोठ्या फरकाने पराभूत केले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जवळपास २० कोटींची कामे अनिल देशमुख आमदार असताना मंजूर करण्यात आली होती. या निधीच्या वितरणाचे आदेशही काढण्यात आले होते. आता ही कामे रद्द करावी, असे पत्र आमदार ठाकूर यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रावर नेमके काय करावे, यासंदर्भात पुन्हा पत्रांचा खेळ सुरू झाला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना मार्गदर्शन मागितले आहे. हे पत्र उघड झाल्यानंतर मंगळवारी सलील देशमुख यांनी परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.

Ashish Shelar : यावर्षीपासून साजरा होणार आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव !

द्वेषाच्या राजकारणापोटी भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर हे जाणीवपूर्वक विकासकामे थांबवीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी अधिकाऱ्यांनीसुद्धा ही कामे रोखण्यापूर्वी चारवेळा विचार करावा, असा इशारा त्यांनी दिला. मतदारांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयाचे दार ठोठावू, असेही सलील देशमुख यांनी सांगितले.