Breaking

Ambazari Road Construction : अर्धा मार्ग बंद होणार, पूर्ण मार्ग खुला होणार !

Ambazari bridge will open in February : अंबाझरी पुलाचे काम दृष्टीपथात; फेब्रुवारीपर्यंत थांबावे लागणार

Ambazari : अंबाझरी तलावाच्या सांडव्यावरील दुसऱ्या बाजूला असलेला पूल तोडून त्याठिकाणी दुसरा पूल तयार करण्यात आला आहे. एका बाजूच्या सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. वाहतुकीची कोंडी दूर व्हावी, यासाठी तात्पुरती दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण मार्ग खुला होण्यासाठी आता १५ फेब्रुवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने फेब्रुवारीपर्यंत थांबायला सांगितल्याने पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा होणार आहे, हे निश्चित आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये पुराचे पाणी या पुलाजवळ अडल्याने पाण्याच्या प्रवाहात अडसर निर्माण झाला होता. त्यामुळे हा पूल तोडून नवा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम उपविभाग ग्रामीणच्यावतीने ८ मे २०२४ पासून पूल तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली होती.

Amravati Police claims of NO Pendency : पोलिसांकडे तक्रारींची ‘नो पेंडन्सी’?

१२ जूनपासून या मार्गावरील पूर्ण वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजुचा पूलही तोडण्यात आला. चौपदरी रस्ता असल्याने सुरुवातीला १५ ऑगस्टपर्यंत दुपदरी रस्ता खुला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. उर्वरित दुपदरी रस्ता ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते होते. पावसामुळे कामात अनेक अडसर निर्माण झाले. ११ मार्च २०२५ पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्याची मुदत आहे, मात्र मुदतीच्या आत हे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. ७ कोटी ५३ लाख रुपये या पुलाचे बजेट आहे, असे पीडब्ल्यूडीकडून सांगण्यात आले.

Sanjay Raimulkar : विकासकामांमध्ये माजी आमदारच आघाडीवर?

सुरुवातीला ३१ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अद्याप सिमेंटीकरणाचे काम बाकी आहे. १९ जानेवारीपर्यंत चारपदरी रस्ता तात्पुरता खुला करण्यात आला आहे. १९ जानेवारीच्या रात्रीपासून दुसऱ्या बाजूचा रस्ता सिमेंटीकरण करण्यासाठी बंद करण्यात येईल. त्यामुळे २० जानेवारीपासून पुन्हा अर्धा रस्ताच वाहतुकीसाठी खुला असेल. हे काम २८ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर २१ दिवस सिमेंटीकरणाला पाणी देण्यात येईल, असे पीडब्ल्यूडीकडून सांगण्यात आले.