Unilateral action by the Public Works Department in Amgaon, Gondia district, angers citizens : सार्वजनिक बांधकाम विभागाची एकतर्फी कारवाई, नागरिकांमध्ये संताप
Gondia : जिल्ह्यातील आमगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. मंगळवारी दोन फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त त्यांच्या दुकानांवर कारवाई केली. मात्र, या चौकातील इतर अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आंबेडकर चौकातील फळ विक्रेते सुमित गणवीर आणि मुकेश बनसोड यांच्यात जुन्या वादावरून भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यात सुमीत गणवीर, त्याचे वडील तसेच मुकेश बनसोड हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्र्यांच्या बनावट लेटरहेडवर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले पत्र !
सार्वजनिक बांधकाम विभागाची एकतर्फी भूमिका..
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करत फळ विक्रेत्यांची अतिक्रमण म्हणून ओळखली जाणारी दुकाने हटवली. मात्र, आंबेडकर चौकात असलेले इतर अतिक्रमण कायम राहिल्यामुळे प्रशासनाची भूमिका वादग्रस्त ठरली आहे. फक्त दोनच दुकाने हटवली, बाकीचं अतिक्रमण का काढलं नाही, असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला.
सर्व अतिक्रमण हटवण्याची मागणी..
स्थानिक रहिवासी भुवन साखरे यांनी यावर नाराजी व्यक्त करत सांगितले, जर अतिक्रमणविरोधी कारवाई करायची असेल, तर ती सगळ्यांवर समानपणे व्हायला हवी. फक्त भांडण करणाऱ्यांवरच कारवाई करणे चुकीचे आहे. नवीन जैन यांनीदेखील प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. आमगाव शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. मोठी दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
Harish Pimpale : भाजप आमदारावर आली होती आंदोलनाची वेळ; अधिकाऱ्यांमुळे टळला प्रसंग
आता पुढे काय?
आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असूनही केवळ दोन दुकानांवर कारवाई करून उरलेल्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात पुढे काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.