Amit Baghel controversy : भाजपच्या नेत्यांची छत्तीसगड सरकारकडे तक्रार!

BJP Leaders Lodge Complaint with Chhattisgarh Government : समाजविरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित बघेलविरोधात कठोर कारवाईची मागणी

Akola सिंधी समाज, अग्रवाल समाज तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भगवान झुलेलाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तथाकथित नेता अमित बघेल याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अकोला येथील भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

खासदार धोत्रे व आमदार सावरकर यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना ईमेलद्वारे बघेल याची तक्रार केली आहे. अमित बघेलने २०१४ पासून सातत्याने समाजात द्वेष निर्माण करणारी, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी आणि धार्मिक भावना भडकविणारी वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. विविध समाजातील महान व्यक्तींविषयी अवमानकारक भाष्य केल्यामुळे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
अलीकडेच रायपूर येथेही त्याने सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल, महाराज अग्रसेन, अग्रवाल समाज तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये केली.

High Court decision : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय;

या वक्तव्यांमुळे समाजात तीव्र रोष निर्माण झाला असून छत्तीसगड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. मात्र, त्याच्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कायदेशीर आणि कठोर कारवाई करून समाजात सौहार्द टिकविण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.