Amit Shah : मराठा आंदोलनावर अमित शाहांचा आढावा

Discussion with Vinod Tawde, Jaranges hunger strike continues : विनोद तावडे यांच्याशी चर्चा, जरांगे यांचे उपोषण सुरूच

Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांच्या या दौऱ्याला राजकीय दृष्टीने मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. शुक्रवारी रात्री मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी विशेष बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबतची अद्ययावत घडामोडी, बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही चर्चेचा विषय झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमका तोडगा निघाला का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून “आरक्षण मिळाल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. सरकारकडून तात्पुरत्या स्वरूपातील मुदतवाढीच्या आश्वासनाऐवजी कायमस्वरूपी तोडगा मिळेपर्यंतच हे उपोषण सुरू राहणार असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता दबाव आणखी वाढला आहे.

Uddhav Vs. Shinde Shiv Sena : बुलढाणा मतदार संघातील चुरशीची निवडणूक न्यायालयात

 

अमित शाह यांच्या दौऱ्यात धार्मिक कार्यक्रमालाही विशेष महत्त्व आहे. ते आज लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतील. याशिवाय अंधेरी पूर्वेतील मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे प्रथमच दर्शन घेण्यासाठी ते दुपारी दीड वाजता येणार आहेत. यामुळे अंधेरी परिसरात मोठी गर्दी आणि उत्साह आहे. अमित शाह आणि भाजप नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काही ठोस दिशा मिळते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

____