Promised to help by holding a meeting in Delhi : दिल्लीत बैठक घेऊन मदत करण्याचे दिले आश्वासन
Mumbai : मुंबई बँकेच्या पुढाकाराने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास ऋण योजनेसाठी नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी केली. तसे निवेदन त्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना दिले.
दरेकर यांच्या निवेदनाला अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या पंधरा दिवसात दिल्लीत बैठक घेऊन मदत करू, असे आश्वासन दिले आहे. अमित शाह काल मुंबई येथे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी आमदार दरेकर यांनी अमित शाह यांना विनंती केली.
Amgaon Police : आमगाव पोलिसांनी रेती तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर पकडले
आमदार दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणेसह अन्य शहरांत अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये लाखो रहिवाशी राहत आहेत. या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जलद गतीने पुनर्विकास होणे गरजेचे आहे. खाजगी विकासकांकडून सुरू झालेले पुनर्विकास प्रकल्प अनेक गैरप्रकारांमुळे रखडले आहेत. त्यामुळे मुंबई बँकेने स्वयंपुनर्विकास कर्ज योजना तयार केली आहे.
Devendra Fadanvis : घरगुती विजेचा खर्च कमी होणार; महावितरणचा सौर ऊर्जा प्रकल्पाचा फायदा !
विकासकाकडून दिल्या जाणाऱ्या लाभापेक्षा अधिक लाभ मिळत असल्याने स्वयंपुनर्विकास योजना लोकप्रिय झाली आहे. तथापि, मुंबई बँकेच्या आर्थिक मर्यादा असल्यामुळे ही योजना पूर्ण ताकदीने पुढे नेण्यात अडचण निर्माण झाली आहे. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून आर्थिक मदत मिळाल्यास अनेक मुंबईकरांना फायदा मिळू शकेल.
दरेकर यांनी अशीही माहिती दिली की, मुंबई बँकेने एनसीडीसीकडे निधी मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र मुंबई आणि उपनगर जिल्हा असल्याने एनसीडीसीकडून मिळालेल्या कर्जाचा उपयोग शहरी गृहनिर्माण कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी करता येत नाही. त्यामुळे एनसीडीसीने जारी केलेल्या कर्ज मंजुरी पत्रातील शहरी गृहनिर्माण घरांव्यतिरिक्त ही अट रद्द करण्याची विनंती केंद्रीय सहकार मंत्री यांना करण्यात आली आहे. या योजनेची मागणी लक्षात घेऊन येत्या पंधरा दिवसांत दिल्लीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे.