Question on union minister in Kaun Banega Crorepati : ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आला प्रश्न, अमिताभ बच्चन यांनी केला उल्लेख
Buldhana ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचा कारभार आहे हा प्रश्न विचारण्यात आला होता. बुलढाणा जिल्ह्यातील भूमिपुत्राने आयुष मंत्रालयात गेल्या 9 महिन्यांमध्ये केलेल्या कामाची ही पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा निवडून आले. खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव केंद्रीयमंत्री पदासाठी शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे यांनी पुढे केले. ९ जुन २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच प्रतापराव जाधव यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार देण्यात आला. गेल्या नऊ महिन्यांच्या कार्यकिर्दीत आयुष मंत्रालयांतर्गत विविध कार्यक्रम राबविले.
Atul Londhe : छत्रपतींच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी !
यामध्ये २६ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशामध्ये देश का प्रकृती अभियान राबविण्यात आले. एक महिन्याच्या कालावधीत या अभियानांतर्गत एक कोटी ५० लाखाच्या जवळपास देशातील नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले. याशिवाय आयुर्वेद ,युनानी ,योगा आयुष विभागार्गत देशातर्गत भरीव काम केले जात आहे. त्यामुळेच ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात १७ फेब्रुवारीला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचा पदभार आहे हा प्रश्न आला.
Jaykumar Rawal : महाराष्ट्र आणि ब्राझीलच्या गोयास राज्यात अनेक बाबींमध्ये साम्य !
खुद्द अमिताभ बच्चन यांनी हॉटसिटवरील स्पर्धकाला हा प्रश्न विचारला. बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्याची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली. ही बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांसाठी गौरवाची गोष्ट आहे. कर्तुत्वाला जेव्हा नेतृत्वाची साथ मिळते तेव्हा ते नेतृत्व फुलते आणि फुललेले नेतृत्व सर्वत्र बहारते हे या निमित्याने सिद्ध झाले, असं सर्वसामान्यांमध्ये बोलले जात आहे.