Breaking

Amol Mitkari : कोरटकर दुबईला पळाला? छापा नागपुरात!

 

Find Prashant Koratkar anywhere in the world : मिटकरी म्हणतात, पाताळात असेल तरी शोधून काढा

Akola वादग्रस्त प्रकरणात संशयित असलेल्या कोरटकरने दुबईला पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने त्याच्या हालचालींवर नजर ठेवली असली तरी तो नागपूरवरून थेट दुबईला रवाना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कोरटकर दुबईला गेला असताना पोलीस मात्र त्याच्या नागपूरच्याच घरावर पाळत ठेवून आहेत.

आमदार अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. या प्रकरणामुळे सरकार आणि गुप्तचर यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. नागपुरातील दंगलीचा आधार घेत तो दुबईला पळाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिटकरी यांनी कोरटकर कुठेही असला तरी सरकारने त्याला शोधून काढावे, अशी मागणी ‘X’ वर पोस्टद्वारे केली आहे.

अलीकडेच नागपूर शहरात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयितांवर कारवाई सुरू केली होती. त्याच दरम्यान कोरटकरने गोंधळाचा फायदा घेत शहरातून निघून जाण्याची योजना आखल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. नागपूर विमानतळावरून तो थेट दुबईला रवाना झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याने आधीच परदेश गाठण्याचे नियोजन केले होते, असा अंदाज पोलिसांना आहे.

Akola MLA Sajid Khan Pathan : साजिद खान म्हणाले, ‘राजराजेश्वर मंदिराचा विकास करा’!

या प्रकरणावर आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गृह खात्याने तातडीने कारवाई करून कोरटकरला अटक करण्याची मागणी केली आहे. “तो पाताळात गेला तरीही सरकारने त्याला शोधून आणावे आणि कठोर कारवाई करावी,” असे मिटकरी म्हणाले. तसेच, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने त्याचा शोध घेऊन त्वरित प्रत्यर्पण प्रक्रिया राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणामुळे सरकार आणि गुप्तचर यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोरटकरला परदेशात पळण्यास मदत करणारे स्थानिक संपर्क कोण होते, याचा तपास सुरू आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पलायन केले की अन्य कोणत्या माध्यमातून तो बाहेर गेला, याचा शोध घेतला जात आहे.

Akola District : थेट ग्रामस्थ देणार निवडून १० सरपंच !

या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत, दोषींवर कठोर कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरटकरला शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत घेण्याचा विचार केला जात आहे. पुढील काही दिवसांत गृह खात्याची भूमिका स्पष्ट होईल.