Amol Mitkari : फडणवीसांनी देशाचं, तर अजित पवारांनी राज्याचं नेतृत्व करावं

MLA said Ajit Pawar should lead the state : आमदार अमोल मिटकरींची गणरायाकडे प्रार्थना

Akola गणेशोत्सवाच्या उत्साहात राजकीय रंगही चढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गणरायाकडे केलेल्या एका प्रार्थनेमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचं नेतृत्व करावं आणि त्यांच्या जागी लवकरच अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत,” अशी प्रार्थना आमदार मिटकरी यांनी गणपती बाप्पाकडे केली आहे.

गणरायाचे स्वागत करण्यासाठी आरोग्यनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात, तुतारीच्या निनादात आणि ढोल-ताशांच्या गडगडाटात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. या वेळी परिसर गणेशोत्सवाच्या गजराने दुमदुमून गेला होता. मिटकरी यांच्या घरच्या बाप्पासाठी यंदा खास ग्रामीण भागातील जुनं गाव साकारण्यात आलं असून, त्यात शेतमळे, बैलगाड्या, विहिरी यांची सुंदर प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

Local Body Elections : ग्रामविकास मंत्र्यांना भेटणार जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य असोसिएशन!

गणेशोत्सव हा एकात्मतेचा आणि आनंदाचा सण आहे. या निमित्ताने मिटकरी यांनी सामाजिक व राजकीय चर्चांना वाव देत सूचक विधान केले. ‘ माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आपले ‘बिग बॉस’ अजित पवार हे महाराष्ट्राचे राजकीय ‘बिग बॉस’ व्हावेत, हेच स्वप्न पूर्णत्वास जाऊ दे, अशी मी गणरायाकडे प्रार्थना केली आहे.”

सध्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वात आमदार मिटकरी यांच्या सहभागाबद्दल चर्चेला जोर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचं वादळ उठलं आहे. अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे नेते असून, उपमुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मिटकरी यांच्या या विधानाकडे केवळ गंमत म्हणून न पाहता, येणाऱ्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

Wet drought : निकष आडवे आले, शेतकऱ्यांची आशा मोडली, सिंदखेडराजात ओला दुष्काळ जाहीर होणार नाही?

महाराष्ट्रात सध्या महत्त्वाच्या निवडणुका जवळ येत असल्याने विविध पक्षांतर्गत हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. अशा वेळी आमदार मिटकरींची ही इच्छा कितपत साकार होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या प्रार्थनेने सणासोबतच राजकीय रंगही अधिक गडद केला आहे.