Ruling MLAs are also victims of brokers in the Mantralay : पाच कोटींच्या कामासाठी पाच लाखांची मागणी, आमदाराचा आरोप
Akola मंत्रालयात मोठ्या प्रमाणात दलालीचे प्रकार सुरू आहेत. याचा मला स्वतःलाही वाईट अनुभव आला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) पक्षाचे NCP आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
MVA मविआ सरकारच्या काळात तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे यांच्या ओएसडीने दलालामार्फत शेत पाणंद रस्त्याच्या पाच कोटींच्या कामासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट मिटकरी यांनी केला. त्यांनी या प्रकाराला नकार दिला आणि वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर संबंधितांवर कारवाईही झाली, असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी स्वीय सहाय्यक व ओएसडींच्या नेमणुकीसंदर्भात घेतलेल्या कठोर भूमिकेचे मिटकरी यांनी समर्थन केले. “कुणाला राग आला तरी चालेल, पण आरोप असलेल्यांची नियुक्ती होणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.
मंत्रालयात रोहयो, आरोग्य आणि इतर विभागांतही मोठ्या प्रमाणावर दलाली सुरू होती, असा दावा मिटकरींनी केला आहे. मंत्री आणि त्यांच्या ओएसडीमार्फत दलालांच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचेही आरोप त्यांनी केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ओएसडी आणि स्वीय सहाय्यकांच्या नेमणुकीवरील नियंत्रण स्वतःकडे ठेवण्याचा घेतलेला निर्णय योग्य, असल्याचे मत मिटकरींनी व्यक्त केले आहे
Zilla Parishad School : कमी पटसंख्यांच्या शाळांवर टांगती तलवार !
मिटकरी यांनी केलेल्या आरोपांमुळे मंत्रालयातील दलालीचा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत आहेत. मंत्रालयातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री कोणते पुढील पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.