NCP MLA Amol Mitkari’s counterattack on Gopichand Padalkar : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार
Amravati : छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमांना कुणालाही बोलविण्याची गरज नाही. हे सर्व महापुरूष राष्ट्राचे दैवत आहे. आम्ही कधी निमंत्रणाची वाट पाहत नाही आणि कोणत्याही महापुरुषाचा ठेका कोणत्याही लोकप्रतिनिधीने घेतलेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
आमदार मिटकरी काल (१६ एप्रिल) अमरावती विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी अमरावतीमध्ये आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. महापुरूष कोण्या एका जातीचे नाहीत. जो कोणी महापुरुषाला एका जातीच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख व्यक्ती तोच असू शकतो, असेही ते म्हणाले.
BJP Janata Darbar : भाजपच्या मंत्र्यांचा प्रत्येक महिन्याला प्रदेश कार्यालयात जनता दरबार !
निव्वळ शो बाजी करून जे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडून असे वक्तव्य येत असेल तर त्याला काय म्हणावे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे मिळून सरकार चालवत आहेत आणि उत्तम चालवत आहेत. त्यामुळे कुणाच्याही टिकांना भीक घालण्याची गरज नाही, असे आमदार मिटकरी म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारले असता, यापूर्वीदेखील आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात भाजपवर टीका केली होती. कुणी कुणाची भेट घेणे, यावर बंधन टाकता येणार नाही. हा लोकशाहीमधला एक भाग आहे. आता त्यांची युती होते, आघाडी होती की बिघाडी होते ते येणाऱ्या निवडणुकीत ठरेल. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, इतर नेत्यांना भेटण्याचा अधिकार आहे, असे मिटकरी म्हणाले.
Devendra Fadanvis : अमरावतीत काही चांगलं झालं की माझ्या आईला आनंद होतो !
संभाजी भीडे यांच्याबद्दल आमदार मिटकरींनी केलेल्या ट्विटबद्दल विचारले असता, मी कुणाचं नाव घेतलेलं नाही. मी तर म्हणतो की त्या कुत्र्याचा शोध घेतला पाहिजे. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवा आणि त्या कुत्र्याला भर चौकात फाशी द्या. आम्ही कुणाचं नाव घेतलं नाही. अशाप्रकारे चावणे म्हणजे काय मोघलाई लागली का? कुत्रा उठून कोणालाही चावतो म्हणून असं चालणार नाही, असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.