Breaking

Amravati airport : उड्डाण घेतले, पण गोंधळ संपला नाही!

Confusion continues over the name of Amravati airport : अमरावती विमानतळाच्या नावावरून संभ्रम कायम

Amravati दीर्घ प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळावरून मुंबईसाठी प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ झाला असला, तरी उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नावावरून निर्माण झालेला गोंधळ चांगलाच गाजतो आहे. निमंत्रण पत्रिका आणि कार्यक्रमातील दृकश्राव्य क्लिपमध्ये दोन वेगवेगळ्या नावांचा उल्लेख झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)ने हात वर करत ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेतली आहे.

उद्घाटनाच्या दोन दिवस आधी अलायन्स एअर लाइन्सने प्रसारित केलेल्या निमंत्रण पत्रिकेत विमानतळाचे नाव ‘डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ’ असे दर्शविण्यात आले होते. त्यामुळे या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली. मात्र, बुधवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आलेल्या दृकश्राव्य क्लिपमध्ये ‘प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ’ असे नाव झळकले.

Pravin Datke : काँग्रेसची सद्भावना यात्रा म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा केवीलवाणा प्रयत्न !

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एमएडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी स्पष्ट केले की, निमंत्रण पत्रिकेतील नाव अलायन्स एअरची चूक होती, तर कार्यक्रमातील क्लिपबाबत एजन्सीकडून झालेल्या गोंधळामुळे नाव चुकीचे झळकले. संबंधित एजन्सीकडून स्पष्टीकरण मागवले असून, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही एमएडीसीने सांगितले.

Chandrashekhar Bawankule : बाळासाहेब असते तर त्यांच्या बुडावर लाथच घातली असती !

या संपूर्ण प्रकरणामुळे विमानतळाच्या नावावरून उद्भवलेला गोंधळ अधिकच गहिरा झाला आहे. स्थानिक पातळीवर या विषयावर तीव्र चर्चा सुरू असून, कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान असा गोंधळ कसा झाला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अद्याप विमानतळाला कोणते अधिकृत नाव देण्यात आलेले नाही, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.