Announcement of six board presidents in Amravati : भाजपकडून अमरावतीत सहा मंडळ अध्यक्षांची घोषणा; बडनेराचा तिढा कायम
Amravati भारतीय जनता पार्टीने अमरावती शहरातील सहा मंडळ अध्यक्षांची नावे जाहीर केली आहे. बडनेरा मंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मात्र अद्याप प्रलंबित आहे. मुंबई येथील प्रदेश कार्यालयातून कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी ही नावे अधिकृतपणे घोषित केली.
नवनियुक्त मंडळ अध्यक्षांमध्ये संत गाडगेबाबा मंडळासाठी अभिजित वानखडे, कॉटन मार्केट मंडळासाठी सचिन नाईक, विद्यापीठ मंडळासाठी प्रफुल बोके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच स्वामी विवेकानंद मंडळाचे अध्यक्ष संतोष कावरे, अंबा मंडळाचे अध्यक्ष मनीष चौब तर साई मंडळाच्या अध्यक्षपदी भारती गुहे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Sunil Tatkare : आमदार संग्राम जगतापांनंतर संग्राम कोते पाटलांनाही तटकरेंकडून ‘खो’ !
ही नावे रविवारी मुंबईत झालेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंतिम करण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपच्या संघटन पर्व अभियानाअंतर्गत शहर पातळीवर ही निवड प्रक्रिया पार पडली आहे.
Cooperative Sector : अमरावती जिल्ह्यात सहकाराची दोन नवी दालनं उघडणार!
स्थानिक बैठकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून नावे निवडण्यात आली होती. त्यानंतर ती नावे अंतिम मान्यतेसाठी मुंबई प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सर्व नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचे भाजपा अमरावती शहर जिल्हा व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. बडनेरा मंडळासाठी अध्यक्षपदाचे नाव लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.








