BJP appoints three presidents in Amravati : प्रदेशाध्यक्षांकडे पालकत्व असलेल्या जिल्ह्यात नेतृत्वाचे विकेंद्रीकरण
Amravati प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्याकडे पालकत्व असलेल्या अमरावती जिल्ह्याला तीन अध्यक्ष देण्यात आले आहे. नागपूरचेही पालकत्व बावनकुळेंकडेच आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्येही तीन अध्यक्ष देण्यात आले आहे. अमरावतीमध्ये भाजपने अमरावती शहर, अमरावती ग्रामीण (मोरणी) आणि मेळघाट असे तीन भाग केले आहेत आणि तिन्ही ठिकाणी तीन अध्यक्ष दिले आहेत.
अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख, मेळघाट जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार प्रभूदास भिलावेकर तर शहर जिल्हाध्यक्षपदी डॉ. नितीन धांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविराज देशमुख यांच्याकडे तिवसा, मोर्शी, धामणगाव रेल्वे आणि बडनेरा या साडेतीन विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी देण्यात आली आहे.
मेळघाट, दर्यापूर आणि अचलपूर या आदिवासी व ग्रामीण भागातील तीन विधानसभा क्षेत्रांचा भार प्रभूदास भिलावेकर यांच्याकडे असणार आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघ आणि बडनेऱ्याच्या शहरी भागासाठी डॉ. नितीन धांडे यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात भाजपचे नवे अध्यक्ष कोण असणार, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर मंगळवारी पक्षाने अधिकृत घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला. “नवा गडी, नवा राज” या उक्तीनुसार भाजपने नव्या चेहऱ्यांवर भर देत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची रणनीती सुरू केली असल्याचे संकेत मिळत आहेत.
Akola BJP : अकोल्यात भाजपचे ओबीसी कार्ड; जयंत मसनेंवर विश्वास कायम!
या नव्या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच, आगामी निवडणुकांमध्ये भाजप स्थानिक पातळीवर अधिक प्रभावीपणे उतरू पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.