Congress agitation for exemption of interest on property tax : महापालिकेला घेराव, मालमत्ता करावरील व्याजमाफीसाठी आंदोलन, प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी
Amravati अमरावती महानगरपालिकेने Amravati Municipal Corporation शहरातील नागरिकांवर मालमत्ता करासोबत २ टक्के व्याज लागू केले होते. काही दिवसांपूर्वी महापालिकेने या व्याजमाफीसंदर्भात निर्णय घेतला. मात्र, ज्या नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरला आहे, त्यांच्या संदर्भात कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. याविरोधात अमरावती शहर काँग्रेस कमिटीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांशी चर्चा करायला थेट महापालिका कक्षात आंदोलक पोहोचले.
काँग्रेसने महापालिकेवर आरोप केला की, नागरिकांकडून व्याजाच्या स्वरूपात वसूल केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी परत करण्याऐवजी महापालिकेने तो हडप करण्याचा डाव आखला आहे. त्यामुळेच, या संदर्भात स्पष्ट धोरण जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली. आंदोलनादरम्यान काँग्रेसने मागणी केली की, “ज्या नागरिकांकडून महापालिकेने व्याज वसूल केले आहे, तो परतावा २४ तासांच्या आत सुरू करावा. अन्यथा, तोच पैसा पुढील वर्षभर २ टक्के व्याजासह परतावा द्यावा.”
Dr. Pankaj Bhoyar : पालकमंत्र्यांचा कानमंत्र, आयुष्याचा निर्णय योग्यवेळी निर्णय घ्या!
महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले की, “नागरिकांनी भरलेले व्याज पुढील वर्षीच्या मालमत्ता करात समायोजित केले जाईल. तसेच, दोन आठवड्यांत सर्व योग्य बाबी तपासून यासंदर्भात अंतिम निर्णय जाहीर करू.” आयुक्तांच्या या आश्वासनानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले.
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे Milind Chimote, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, माजी उपमहापौर अशोक डोंगरे, माजी नगरसेवक बाळासाहेब भुयार, माजी नगरसेवक मुन्ना राठोड, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांनी केले.
यावेळी संजय वाघ, प्रदीप हिवसे, सलीम बेग, धीरज हिवसे, विजय वानखडे, सुनील जावरे, सादिक शाह, गजानन गाढवे, प्रशांत पडसे, शोभा शिंदे, तृप्ती झा, अरमा परवीन, वंदना धोरात, अपर्णा अहिरे, आरती पिंपळे, भारती क्षीरसागर, कीर्तीमाला चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.