Amravati Congress : काँग्रेस घालणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव !

Congress will besiege Guardian Minister Chandrashekhar Bawankule : अनियमित पाणीपुरवठ्यावर काँग्रेस आक्रमक, जीवन प्राधिकरणाला धारेवर धरले

Amravati : शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी (१ एप्रिल) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना जाब विचारला. तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. अन्यथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालण्याचा इशारा दिला.

काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वाखात कार्यकर्त्यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयात जोरदार आंदोलन केले. शहरातील बहुतांश भागांमध्ये अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रात्री उशिरा, ११-१२ वाजता पाणीपुरवठा होत असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Randhir Sawarkar : प्रकल्पग्रस्तांसाठी वयोमर्यादेची अट शिथील करा !

प्रशासन दरवेळी वेगवेगळी कारणे सांगत असले, तरी कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. मे महिन्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. २०-२५ वर्षांपूर्वीची पाणीटंचाईची स्थिती आज आधुनिक काळात पुन्हा निर्माण झाली आहे, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

प्रशासनाचे स्पष्टीकरण आणि काँग्रेसचा संताप..
काँग्रेस शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, “शहराच्या गरजेसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही. जुन्या जलवाहिन्या गळतीमुळे कमकुवत झाल्या आहेत. त्यांचे पुनर्निर्माण आवश्यक आहे, असे उत्तर देण्यात आले. नवीन जलवाहिन्यांच्या कामाचा विचार करता, ऑक्टोबर २०२४ मध्ये वर्कऑर्डर दिल्यानंतरही कंत्राटदारांनी काम सुरू केलेले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. असे कंत्राटदार कारवाईच्या कक्षेत का आणले जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Bank Fraud : खासदारांच्या पत्रालाही केराची टोपली !

शासनाचे नियोजन शून्य..
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे प्रश्न का मांडले जात नाहीत? प्रशासन आणि शासनाचे नियोजनच ठोस नसल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असाही घणाघाती आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.