₹500 crore sanctioned for multiple development projects : महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती; निधी तातडीने वितरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Amravati शहरातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अमरावती महापालिकेच्या हद्दीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पेरी-फेरी प्लॅन तसेच विकास आराखडा (डी.पी.) मंजूर करण्यात आला. याअंतर्गत शहरातील विविध विकासकामांसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नवीन महापालिका इमारतीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी तसेच कोंडेश्वर येथील बोधीभूमी प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उपमुख्यमंत्री (वित्त) अजित पवार यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवी राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे आदी उपस्थित होते.
Local Body Elections : वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सचिवाची प्रतिष्ठा पणाला
महापालिका हद्दीतील पेरी-फेरी प्लॅन (सिमेंट रोड क्षेत्र) याचा सविस्तर आराखडा तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या राजकमल उड्डाणपुलासाठी १७ कोटी रुपये मंजूर करून काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पीआर कार्ड वितरण युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
धार्मिक व सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने कोंडेश्वर येथील बोधीभूमी प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. तसेच इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अद्ययावतीकरण व परिसराचे सौंदर्यीकरण सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
Local Body Elections : लावा पैज… कोण जिंकणार?’ नगरपरिषदेच्या निकालावर चर्चेला उधाण
नेहरू मैदान कायम ठेवण्यात येणार असून टाऊन हॉलचे सौंदर्यीकरण, अमरावती मेगा टेक्सटाईल पार्क तसेच अन्य औद्योगिक प्रकल्पांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अंबा देवी व एकवीरा देवी मंदिर परिसराचा संपूर्ण आराखडा अंतिम करून विकासकामे सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली. अमरावतीतील आयटी पार्क प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले.








