Birth and death certificates are not issued without paying a bribe : महापालिकेत ढिसाळ कारभार, महिला नेत्यांची आयुक्तांकडे धाव
Amravati महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन ढिसाळ आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रचंड अनियमितता आहे. आणि आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय कामे होत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या प्रकरणामुळे शिवसेना व युवा स्वाभिमानच्या महिला पदाधिकारी संतप्त झाल्या. त्यांनी थेट महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडे धाव घेतली. हा सर्व गोंधळ थांबवू नागरिकांना वेळेत दाखले देण्याची मागणी लावून धरली आहे. महापालिकेच्या मुख्यालयातील जन्म-मृत्यू विभागातून दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. शाळा प्रवेश, निवृत्ती लाभ, मालमत्ता हस्तांतरण, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना जन्मदाखल्यांची आवश्यकता असते.
Wardha MIDC Mahayuti Government : वर्धा एमआयडीसीची सूत्रं नागपूरकडे !
परदेश प्रवासासाठीही हे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. मात्र, नागरिकांना या दाखल्यांसाठी अनेकदा महापालिकेच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित आहे. तरीही दाखले मिळण्यास होणारा विलंब गंभीर समस्या ठरत आहे. याआधी ऑफलाइन कामकाजात दोन ते तीन दिवसांत दाखले मिळत असत. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेच्या नावाखाली कंत्राटी गोंधळाने नागरिकांची गैरसोय होत आहे, असा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केला.
जन्माऐवजी मृत्यूचे प्रमाणपत्र
१४ जानेवारी रोजी एका युवतीला जन्माऐवजी मृत्यूचे प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनाही संबंधित बाब कळवण्यात आली आहे. नियमांनुसार मृत्यू प्रमाणपत्रासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र किंवा स्मशानभूमीच्या अंत्यविधीची पावती अनिवार्य असते. मात्र, संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे अशा गंभीर चुका होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
MLA Manoj Kayande : चोखामेळांच्या जन्मोत्सवात रंगला राजकीय आखाडा !
सुधारणा करा
या गोंधळासंदर्भात शिवसेनेचे नेते प्रवीण हरमकर, गोविंद दायमा, आनंद राठी, रमेश गुरमाळे, मनीष रामावत, प्रमोद वानखडे, निकेश शर्मा, अजीम खान, आणि कमलेश गुप्ता यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे.