Break on new plans, focus on project pendings : अमरावती महापालिकेचे अंदाजपत्रक; शिक्षण, आरोग्य अन् स्वच्छतेला प्राधान्य
Amravati अमरावती महानगरपालिकेचा सन २०२५-२६ चा ८८७.६९ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शुक्रवारी सादर केला. नवीन योजना वा उपक्रमांना ब्रेक लावला आहे. तर प्रलंबित विकासकामे आणि प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. आर्थिक शिस्तीला प्राधान्य देत शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकानुसार, एकूण खर्च ७३९.७४ कोटी असून, १४७.९५ कोटी शिल्लक दर्शविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सामान्य प्रशासन विभागावर सर्वाधिक ३३.८८ टक्के खर्च होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मालमत्ता कर आहे. आयुक्तांनी यंदा ९० कोटी रुपयांची वसुली झाल्याची माहिती दिली. ही रक्कम गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट असल्याचा दावा करण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्षात महसुली उत्पन्नाचे विस्तारीकरण करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
Amravati Municipal Corporation : महापालिकेकडून पोलीस बंदोबस्तात कर वसुली
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पाचा गोषवारा
प्रारंभिक शिल्लक: १६१.७१ कोटी
एकूण उत्पन्न: ७२५.९७ कोटी
एकूण उपलब्ध निधी (प्रारंभिक शिल्लक धरून): ८८७.६९ कोटी
एकूण खर्च: ७३९.७४ कोटी
अखेरची शिल्लक: १४७.९५ कोटी
उत्पन्नाचे स्रोत
प्रारंभिक शिल्लक: ०.२५%
मनपा दर व कर: ८४.०५%
विशेष अधिनियमाखालील वसुली
इतर शास्ती व कर: ३.८१%
अनुदाने व अंशदाने: १०.५०%
संकीर्ण उत्पन्न: १.६३%
Amravati Municipal corporation : आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय मिळत नाहीत दाखले !
खर्चाचे वितरण
सामान्य प्रशासन विभाग: ३३.८८%
सार्वजनिक सुरक्षितता: ६.३४%
आरोग्य सुविधा: ३२.६३%
शिक्षण: १७.४१%
अनुदाने व अंशदाने: ०.०२%
संकीर्ण खर्च: १.६६%
भांडवली खर्च (स्वनिधी): ७.८३%
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
२९ आरोग्य केंद्रांची उभारणी
घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा संकलन प्रणाली सुधारणा
६३ डिजिटल शाळांची उभारणी
चौकांचे सौंदर्यीकरण आणि मुख्य रस्त्यांवर हायमास्ट लॅम्प
शिवटेकडी व नगरोत्थान विकास प्रकल्प
स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र स्थापन
अग्निशमन विभागाचे बळकटीकरण; बडनेरा व रहाटगाव येथे नवीन केंद्र
सुकळी येथे जनावरांची शवदाहिनी
टीबी रुग्ण स्क्रिनिंग व पीएम ई-बससेवा
३३ वर्षांवरील महिलांची मोफत आरोग्य तपासणी
Amravati Municipal Corporation मालमत्ता करापोटी भरलेले ३१ लाख फस्त!
महानगरपालिकेच्या यशस्वी उपक्रमांचा गौरव
१) स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशात दुसरा क्रमांक; ५० लाखांचे बक्षीस
२) ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत अमरावती विभागात प्रथम क्रमांक; दीड कोटी रुपयांचे बक्षीस
अर्थसंकल्पाचा संक्षिप्त आढावा
एकूण अपेक्षित खर्च: ७३९.७४ कोटी
महसुली खर्च: ४००.६६ कोटी
भांडवली खर्च: ३१६.२८ कोटी
असाधारण ऋण व निलंबन खर्च: २२.८० कोटी
महसुली अखेर शिल्लक: १.५७ कोटी
भांडवली अखेर शिल्लक: १३१.९२ कोटी