Deposits of 202 among 661 candidates seized : ३७२ उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळणार
Amravati नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एकूण ६६१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ३७२ उमेदवारांनी अनामत रक्कम वाचवण्यात यश मिळवले, तर २०२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. संबंधित २०२ उमेदवारांना त्यांच्या प्रभागातील विजयी उमेदवाराच्या एकूण मतांच्या किमान ८ टक्के मते मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून ती परत मिळणार नाही.
दरम्यान, ३६० पेक्षा अधिक उमेदवारांनी त्यांच्या वार्डातील एकूण मतांच्या ८ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवली आहेत. त्यामुळे या उमेदवारांना त्यांनी भरलेली अनामत रक्कम परत मिळणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करताना उमेदवारांना अनामत रक्कम भरावी लागते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला उमेदवारांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपये, तर इतर मागास वर्ग (ओबीसी) व सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना प्रत्येकी ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागली होती.
Nitin Gadkari : गडकरींनी स्पष्टच सांगितलं, साहित्य संघाच्या निवडणुकीशी माझा संबंध नाही
नामांकन अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ६६१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी ८७ उमेदवार विजयी झाले. उर्वरित उमेदवारांपैकी ३७२ जणांनी अनामत रक्कम वाचवली, तर २०२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
जप्त अनामत रक्कम असलेल्या २०२ उमेदवारांमध्ये ओबीसी व सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उमेदवारांचा समावेश आहे. ओबीसी व सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. तर महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उमेदवारांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपये गमवावे लागले आहेत.








