Amravati Municipal Corporation : राणा-खोडके यांच्यात ‘ओपन वॉर’, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले

Mahayuti faces internal discord before amravati poll campaign : अमरावती महापालिका निवडणुकीत प्रचारापूर्वीच महायुतीत वाद

Amravati अमरावती महापालिका निवडणूक प्रचाराला अद्याप औपचारिक सुरुवातही झालेली नसताना भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेश संघटक आमदार संजय खोडके यांच्यात रविवारी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक वाद चांगलाच उफाळून आला असून राजकीयदृष्ट्या पाहून घेण्याची भाषा वापरण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद आगामी महापालिका निवडणुकीत अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी अजित पवार यांना थेट सल्ला देत, “कोणतेही वक्तव्य करताना मर्यादा ओलांडू नका,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

Devendra Fadnavis : सत्तर वर्षांत शहरी विकासाकडे दुर्लक्ष, फडणविसांची टीका

राणा म्हणाल्या की, महायुतीच्या एकत्रित पाठिंब्यावर हे सरकार स्थापन झाले आहे. अशा परिस्थितीत सत्तेत सहभागी असतानाच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे आणि संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. जबाबदारीच्या पदावर असलेल्या नेत्यांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. राजकीय मतभेद असले, तरी जनतेसमोर चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वादाला नवे वळण मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेश संघटक आमदार संजय खोडके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “औकातीत राहून बोलायला शिका,” अशा शब्दांत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर घणाघात केला.
आमदार खोडके म्हणाले की, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली होती. त्या विषयावर भाजप प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे. मात्र नवनीत राणा यांच्या इतकी औकात नाही, तरीही त्या मध्येच बोलू लागल्या, असा आरोप त्यांनी केला.खोडके

Asaduddin Owaisi : ओवैसी म्हणतात, ‘मी स्वतःला नेता मानत नाही’!

पुढे म्हणाले की, नवनीत राणा यांना प्रथमच खासदार म्हणून निवडून आणण्यात काँग्रेसची मोठी भूमिका होती. काँग्रेसनेच त्यांना तिकीट देऊन संसदेत पाठविले; तरीही त्यांनी पक्षाशी बेईमानी केली. पुढेही अशाच प्रकारची विधाने सुरू राहिली तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा हिशोब ठेवू आणि पुढील निवडणुकीत त्या कशा जिंकतात ते पाहू, असा इशाराही आमदार खोडके यांनी दिला.