Students were reported to have mid-day meal on holidays : सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन घेतल्याची नोंद
Amravati प्रधानमंत्री पोषण शक्तिनिर्माण योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील शाळांमध्ये महिला बचत गटांमार्फत विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप केले जाते. मात्र, शासकीय सुटीच्या दिवशीही काही शाळांनी खिचडी वितरित केल्याचा बनाव करून पोर्टलवर चुकीची माहिती सादर केली आहे. या प्रकरणात अमरावती महानगरपालिकेच्या आठ शाळांचा गैरप्रकार उघड झाला असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शाळांनी पोर्टलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवून त्यानुसार इंधन, भाजीपाल्यासारख्या खर्चाचे देयके ऑनलाइन जनरेट केली जातात. परिणामी, या बनावट हजेरीमुळे शाळांच्या खात्यावर अनुदान जमा झाले. राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईचे निर्देश दिले आहेत.
Heaven in Hell : संजय राऊतांची गत म्हणजे ‘मान ना मान, मै तेरा मेहमान’ !
महापालिका मराठी शाळा, बेनोडा, महापालिका उर्दू गर्ल्स स्कूल नं. ३, जुनीवस्ती बडनेरा, महापालिका मराठी शाळा, अकोली, संत गाडगे बाबा प्रायमरी स्कूल, शिवाजीनगर, महापालिका प्रायमरी मराठी स्कूल नं. २०, नवाथे नगर, असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल, चांदनी चौक, महापालिका उर्दू प्रायमरी स्कूल नं. ५, फ्रेजरपुरा या शाळांनी सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवली आहे. यात एका शाळेचे नाव उघड करण्यात आले नाही.
प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज दीडशे ग्रॅम खिचडी दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थी इतकी खिचडी खातात का, हा संशोधनाचा विषय असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. काही शाळांमध्ये टक्केवारीच्या गणितातून विद्यार्थ्यांचा आहार बायपास केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Heaven in Hell : मला अटक करण्यापूर्वी माझ्या मित्रांना त्रास दिला, राऊतांचा दावा !
शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी पाच शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दिली. “सुटीच्या दिवशी पोर्टलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती अनावधानाने नोंदवली गेल्याचे स्पष्टीकरण काही मुख्याध्यापकांनी दिले असले तरी, १९ मेपर्यंत खुलासा सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.