Amravati Municipal Corporation Election : भाजप-काँग्रेसला घ्याव्याच लागतील इतर पक्षांच्या कुबड्या!

45 councillors needed to form power in Amravati : मनपात सत्ता स्थापनेसाठी ४५ नगरसेवकांची गरज; पक्षांतर्गत बैठकींना वेग

Amravati महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागूनही कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांना इतर पक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. महापौरपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतरच महापौर कोण होणार, हे स्पष्ट होईल. मात्र, सध्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेसकडून भाजपला ‘कुबड्यांची आवश्यकता भासणार’ असे सूचक विधान करण्यात आले आहे. भाजपने यावर जाहीर प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी पक्षांतर्गत बैठका सुरू झाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी ४५ नगरसेवकांची आवश्यकता असल्याने भाजपला सर्वाधिक ४५.४५ टक्के स्ट्राईक रेट असलेल्या युवा स्वाभिमान पार्टी (वायएसपी) च्या पाठिंब्याची गरज भासणार असल्याचे चित्र आहे.

मनपा निवडणूक झाली असली तरी अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे महापौर कोण होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. सोमवारी महापौर पदाचे आरक्षण जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौरांची निवड ही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक प्रक्रिया असल्याने आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Akola Municipal Corporation Election : सत्तास्थापनेसाठी हवा फक्त एक नगरसेवक, महायुतीची परीक्षा

भाजप २५ नगरसेवकांसह मनपात सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, बहुमतासाठी त्यांना इतर पक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. वायएसपीचे १५ नगरसेवक निवडून आले असून, भाजप–वायएसपी मिळून संख्याबळ ४० होते. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) चे ३ नगरसेवक जोडल्यास आकडा ४३ वर पोहोचतो. उर्वरित २ नगरसेवक बसपाकडून (३ नगरसेवक) मिळवावे लागतील किंवा फोडाफोडीचा मार्ग अवलंबावा लागेल.

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या वाढणार !

काँग्रेसचे १५ नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेसाठी त्यांना एमआयएम (१२) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट – ११) यांची मदत घ्यावी लागेल. तरीही संख्याबळ ३८ इतकेच होते. बहुमतासाठी बसपा (३), शिवसेना उबाठा (२) आणि वंचित बहुजन आघाडी (१) यांचा पाठिंबा घेतल्यानंतरही एक नगरसेवक अधिक आवश्यक राहतो. त्यामुळे या समीकरणात बसपाची भूमिका निर्णायक ठरू शकते.