Breaking

Amravati Police claims of NO Pendency : पोलिसांकडे तक्रारींची ‘नो पेंडन्सी’?

Claims that 85% of pending complaints in the department have been resolved : खात्यातील ८५ % प्रलंबित तक्रारींचा निपटारा झाल्याचा दावा

Amravati कोरोना काळापासून प्रलंबित असलेल्या तक्रार अर्जांचा निपटारा करणे आणि तक्रारदारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने शहर पोलिसांनी १३ ते १६ जानेवारीदरम्यान तक्रार निवारण अभियान राबविले. या मोहिमेत शहर पोलिसांनी ३,७१९ प्रलंबित अर्जांपैकी ३,१७२ अर्जांचा यशस्वी निपटारा केला. यासह ११ प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे. यातून पोलीस विभागात जवळपास नो पेंडन्सीची स्थिती असल्याचे दिसत आहे.

या अभियानात ११ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये चार फसवणूक आणि विश्वासघाताचे, पाच महिला विरोधातील आणि दोन सायबर फ्रॉड संदर्भातील प्रकरणे आहेत. सायबर संदर्भातील ११२ प्रकरणांच्या अर्जांचादेखील निकाल लावण्यात आला.

Officials busy in Games : जिल्हा परिषदेतील रिकाम्या खुर्च्यांनी केला हिरमोड!

तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पोलिस आयुक्त रेड्डी यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. १२ ते १६ जानेवारी दरम्यान वसंत हॉल येथे हा उपक्रम झाला. शहरातील दहा पोलिस ठाण्यांचे ठाणेदार व संबंधित तक्रार अर्जांची चौकशी करणारे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. नियोजनपूर्वक दर दिवशी संबंधित तक्रारदार व गैर-अर्जदारांना बोलावण्यात आले.

त्या तक्रारींवर सखोल चर्चा करण्यात आली. दोन्ही पक्षांचे समाधान झाले, तर त्या तक्रारीचा निपटारा करण्यात आला. काही तक्रार अर्ज दिवाणी स्वरूपाचे असल्यामुळे संबंधित तक्रारदारांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची सूचना देण्यात आली. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि सागर पाटील यांच्यासह सर्व एसीपी आणि ठाणेदार परिषदेत उपस्थित होते.

Divisional Commissioner of Amravati : विभागीय आयुक्तांचे पथक धडकले जिल्हा परिषदेत

त्या अधिकाऱ्यांची होणार बदली
तक्रार निवारण अभियानात काही तक्रार अर्ज प्रलंबित राहण्याचे कारण तत्कालीन पोलिस अधिकारी किंवा अंमलदारांच्या निष्काळजीपणामुळे असल्याचे समोर आले आहे. अशा पाच अधिकाऱ्यांची शहरातून इतरत्र बदली करण्यात आलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा कसुरी अहवाल सध्या कार्यरत असलेल्या घटक प्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्त रेड्डी यांनी सांगितले.