Amravati Shikshak Bank : शिक्षक बँक संचालक मंडळावर तातडीने कारवाईची करा

Take immediate action against the Board of Directors : अनियमिततेविरोधात बँक विकास आघाडीचे बेमुदत उपोषण

Amravati अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षक सहकारी बँकेतील हुकूमशाही आणि बेकायदेशीर कारभाराविरोधात तक्रारी वाढतच चालल्या आहेत. मात्र, या तक्रारींकडे विभागीय सहनिबंधकांनी सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे बँक विकास आघाडीने विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर ११ मार्च रोजी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने बँक विकास आघाडीने प्रभाकर झोड यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

शिक्षक बँक ही सहकार कायद्यानुसार पगारदार कर्मचाऱ्यांची सहकारी बँक म्हणून नोंदणीकृत आहे. या प्रकारच्या संस्थांमध्ये सेवानिवृत्तीनंतर पदावर राहता येत नाही. मात्र, विद्यमान अध्यक्ष निवृत्त होऊनही पदावर राहण्यासाठी बँकेला नागरी बँक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बँक विकास आघाडीने केला आहे.

Onion Producer farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?

अध्यक्षाच्या या बेकायदेशीर प्रयत्नांना विभागीय सहनिबंधकांनी संमती दिल्याने बँकेला पगारदार कर्मचाऱ्यांची बँक म्हणून टिकवण्यासाठी तसेच इतर अनियमिततांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

बेकायदेशीर नोकर भरती रद्द करा. बँकेने ४३ पदांसाठी केलेली भरती सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे भरतीला अंतिम मान्यता देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. नोकर भरती प्रकरणात अध्यक्ष, संचालक मंडळ आणि सोलापूर नागरी सहकारी बँक असोसिएशनविरोधात अमरावती पोलिसांनी १३ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

Irregularities in soybean procurement : सोयाबीन खरेदीत घोळ, प्रोड्यूसर कंपन्यांसह यंत्रणांचा सहभाग?

सहकार कायद्याच्या कलम ७९-अ नुसार संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करावे. अनियमित वित्तीय व्यवहारांची चौकशी करा. नियमबाह्य इनोवा गाडी खरेदी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. बँकेची निविदा प्रक्रिया आणि अवाढव्य खर्चाची चौकशी करून कार्यवाही करावी, या मागण्यांचाही यात समावेश आहे.