Amrut Yojana : अमरावती जिल्ह्यावर विकासाचे ‘अमृत’ बरसणार!

Rs 55 crore plan for development of railway stations : तीन रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, ५५ कोटींचा विकास आराखडा

Amravati केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील तीन प्रमुख रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. अमरावती, बडनेरा Badnera आणि धामणगाव Dhamangaon या स्थानकांच्या आधुनिकीकरणास मंजुरी मिळाली आहे. एकूण ५५ कोटी रुपयांचा विकास आराखडा अंतिम करण्यात आला आहे.

राज्यातील एकूण १३२ स्थानकांपैकी अमरावती जिल्ह्यातील या तीन स्थानकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, तसेच स्थानकांचा शहराशी सुसंवाद राखला जावा, या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे.

Justice Bhushan Gawai : अमरावतीचे सुपूत्र ठरणार ५२वे सरन्यायाधीश!

बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. तर जुन्या व नव्या वस्तीला जोडणारा जुना पूल पाडून त्याजागी आधुनिक पूल उभारण्यात येत आहे. स्थानकावर नव्याने पादचारी पूल (आरओबी) बांधण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एस्केलेटर्स बसवण्यात आले आहेत. यासाठी ३६ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

धामणगाव रेल्वे स्थानकासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. तसेच येथील प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा केली जाणार आहे. स्वच्छतागृहे, वेटिंग लाउंज, लिफ्ट्स, एस्केलेटर्स, डिजिटल पथदर्शक आणि फूड कोर्ट्स यांचा यात समावेश आहे.

अमरावती स्थानकावरही आधीपासूनच काही विकासकामे सुरू असून, येथील सुविधांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे. स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, शहराशी दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम केली जाईल.

Raju Shetti : महायुतीच्या जाहीरनाम्याविरोधात कोर्टात जाणार

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव Railway minister Ashwini Vaishnav यांनी अमरावती जिल्ह्यातील विकासावर विशेष भर दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी देखील या प्रकल्पांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यात येते.