Breaking

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्याविरोधात पोस्ट टाकणे भोवले !

Bullion trader handcuffed, 19 people made accused :सराफा व्यावसायिकाला बेड्या, 19 जणांना बनविले आरोपी

Ghatanji : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात अपमानकारक आणि अश्लील मजकूर असलेली पोस्ट समाज माध्यमावर रिट्विट केल्या प्रकरणी, घाटंजी येथील नामांकित सुवर्ण व्यापारी शैलेश नंदकिशोर वर्मा (47) याला पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. व्यापारी वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात 19 जणांना आरोपी बनवण्यात आले आहे.

या प्रकरणाची मूळ तक्रार पुणे येथील अ‍ॅड. बसवराज मल्लिकार्जुन यादवाड रा. शनिवार पेठ यांनी 22 एप्रिल रोजी पुणे सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल संकपाळ नावाच्या व्यक्तीने अमृता फडणवीस यांच्याविरोधात अत्यंत अश्लील आणि लज्जास्पद मजकूर पोस्ट केला होता. ही पोस्ट घाटंजीतील शैलेश वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून रिट्विट केली होती. या नंतर वाद निर्माण झाला. वर्मा यांनी तो मजकूर काही वेळाने हटवला, तरी सायबर गुन्हे शाखेने त्याचा मागोवा घेत संबंधित ट्विट आणि रिट्विटच्या आधारे गुन्हा नोंदवला.

Bribery in cemetery work ; स्मशानभूमीच्या कामाचे देयक काढण्यासाठी घेतली लाच

या तक्रारीनुसार निखिल संकपाळ, वर्मा यांच्यासह देशभरातील अन्य १९ जणांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये कलम 67 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी आरोपी सराफा वर्मा याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, 17 मे रोजी न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावल्याने त्यांची अटक अटळ होती.

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस टपल्या, टिचक्या , टोमणे मारण्यात पटाईत !

मंगळवारी १५ जुलैला दुपारी पुणे येथील सायबर पोलिसांचे पथक घाटंजीत दाखल झाले. स्थानिक पोलिस ठाण्याच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे यांच्या नेतृत्वात वर्मा याला पोलिस ठाण्यात बोलावून चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला पुण्याला नेण्यात आले आहे.