Breaking

Anandraj Ambedkar : राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री असलाच पाहिजे

There must be a full time Home Minister in the state : आनंदराज आंबेडकर यांची मागणी

Nagpur महाराष्ट्रात सध्या जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बीड व परभणीसारख्या घटना होतात. कुटुंबांना न्यायासाठी भटकावे लागते. शहरात अस्वस्थता वाढली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, असे चित्र आहे. पुढील काळात मराठा-ओबीसी असा संघर्ष झाला तर आश्चर्य वाटू नये अशी भीती व्यक्त करतानाच राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री असावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आनंदराज आंबेडकर म्हणाले, सरकारी शाळा बंद किंवा त्याचे खासगीकरण केले जात आहे. या देशातील सर्वसामान्य व बहुजनांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यांना अंधश्रद्धेच्या आहारी लावले जात आहे. सरकारने संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केजी टू पीजी शिक्षण मोफत देणे बंधनकारक असताना समाजात तेढ निर्माण होईल, अशी परिस्थिती तयार केली जात आहे.

DPC Akola : अतिरिक्त निधीच्या मागणीला अजितदादा प्रतिसाद देतील?

बीडमधील संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या केल्या जात आहेत. त्यांचे कुटुंबीय व नागरिक न्याय मागत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असे चित्र आहे. तरीही, सन्मानाने जे चर्चा करतील त्यांच्यासोबत रिपब्लिकन सेना जाईल. अंबाझरीतील उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आंबेडकर भवनाचा सर्वंकष तपशील सरकारने जाहीर करावा, असेही ते म्हणाले.

Mahavitaran : स्मार्ट मीटरला कर्मचाऱ्यांचाच तीव्र विरोध!

दीक्षाभूमी परिसराच्या विकासासाठी माता कचेरी व आसपासची जमीन द्यावी, या सर्व प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडणारा तरुण, परभणीतील संविधान प्रतीची नासधूस करणाऱ्या आरोपीला रुग्णालयात ठेवण्यात आले.

त्यांना मनोरुग्ण ठरवून प्रकरण लांबवत ठेवले जात आहे. यामागे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर, हिंदूंचे संविधान तयार आहे, असे सांगितले आहे. ही धोक्याची घंटा असून, आंबेडकरी जनतेने अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे आंबेडकर म्हणाले.