BJP leader MP Anil Bonde targets Shiv Sena chief Uddhav Thackeray over Hindi language compulsion : महाराष्ट्रातील मुलांना समोर जायचे असेल तर जास्तीत जास्त भाषा आल्या पाहिजे
Nagpur : मोठ्या लोकांच्या मुलांना इंग्रजी, फ्रेंच यांसोबत इतरही भाषा शिकवल्या जातात. मग आमच्या ग्रामीण भागातील मुलांना मराठी सोबतच इंग्रजी आणि हिंदी का शिकवू नये, असा प्रश्न भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी केला. ते म्हणाले, सरकारने चांगला निर्णय घेतला होता. पण काही करंट्या लोकांना त्यांचे राजकारण करायचे होते, आपलं पाप झाकायचं होतं, त्यासाठी त्यांचा हा सगळा खटाटोप होता. हा त्यांचा पाप झाकण्याचा प्रयत्न असेल तर उबाठावर एक चित्रपट निघू शकतो.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना खासदार बोंडे म्हणाले, आज जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपले पाप झाकण्यासाठी येवढा खटाटोप करावा लागत असेल, तर खरोखरच यावर चित्रपट काढायला काय हरकत आहे? त्यांचा बुडत चाललेला पक्ष वाढवण्यासाठी त्यांना विजय सभा घ्यावीच लागेल, ते त्यांनी करावं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो निर्णय रद्द केला, त्यासाठी उद्धव टाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला हवे, त्यांचा सत्कार करायला हवा.
Eknath Shinde : शिंदेंची ‘ऊर्जा’ कुणासाठी धोक्याची? नव्या संघटनेमुळे अस्वस्थता!
उद्धव ठाकरे यांनी मराठी – मराठी म्हणत मुख्यमंत्री असताना मराठी माणसाचाच घात केला. त्रिसुत्रीत धोरण अवलंबून महाराष्ट्रात तीन भाषा जाहिर कराव्या, असा माशेलकर समितीचा अहवाल होता आणि तो त्यांच्यात काळात आला होता. माशेलकर समितीचा अहवाल रद्द करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता नरेंद्र जाधव समिती याचा अभ्यास करेल आणि कोणत्या वर्गापासून हिंदी भाषा शिकवली जाऊ शकते, यासंदर्भात अहवाल देईल. हा अतिशय चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील मुलांना समोर जायचे असेल तर त्यांना जास्तीत जास्त भाषा आल्या पाहिजे, असेही खासदार अनिल बोंडे म्हणाले.