Anil Bonde : ‘आय लव्ह मोहम्मद’नंतर आता आणखी एक पोस्टर!

“Ask About Islam” Poster Triggers Religious Controversy in Amravati : अमरावतीत ‘इस्लामविषयी विचारा?’ या पोस्टरमुळे नव्या वादाला तोंड

Amravati ‘आय लव्ह मोहम्मद’ या वादग्रस्त फलकानंतर आता अमरावतीत पुन्हा एकदा धर्मसंबंधी पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. ‘इस्लामविषयी विचारा?’ (Ask About Islam) असा संदेश असलेले नवीन होर्डिंग शहरातील पंचवटी चौकात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर (IIC) तर्फे लावण्यात आले असून, भाजपने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या होर्डिंगविरोधात आवाज उठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असताना असे फलक लावणे हे जाणूनबुजून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंचवटी चौकासह शहरातील इतर प्रमुख ठिकाणी लावलेल्या या फलकावर ‘विचारा इस्लामविषयी’ असा मजकूर असून, त्याखाली एक संपर्क क्रमांक आणि आयआयसीचा लोगो दिला आहे. भाजप नेते बोंडे यांनी याला विरोध दर्शविताना, “ही संस्था धर्मांतराचे षडयंत्र रचत आहे,” असा गंभीर आरोप केला.

Khamgao APMC : खामगाव बाजार समिती सभापतींच्या विरोधातातील अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा!

डॉ. बोंडे यांनी फलकावर दिलेल्या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, ती संस्था हैदराबादस्थित असल्याची आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांत शाखा असल्याची माहिती मिळाली. संवादादरम्यान त्यांनी “कुणाची हत्या करणे इस्लाममध्ये वैध आहे का?” असा प्रश्न विचारला असता, त्यावर “नाही” असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर बोंडे यांनी विचारले, “मग हाच संदेश होर्डिंगद्वारे का देत नाही? आणि देशात घडणाऱ्या दहशतवादी घटनांचा निषेध का करत नाही?” मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Local Body Elections : सिंदखेडराजात तिरंगी लढत, युती-आघाडी आजमावणार नशीब!

डॉ. बोंडे यांनी पुढे म्हटले की, “शाळा-महाविद्यालय असलेल्या हिंदू बहुल भागात अशा स्वरूपाचे होर्डिंग लावणे हे अल्पवयीन मुलांमध्ये धर्मांतराचा प्रचार करण्याचा प्रयत्न आहे.” या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याशी फोनवरून संवाद साधून केली आहे.